World

T20 Live… भारत पाकिस्तान सामना सुरू होण्याआधी पाकिस्तान ने दिली भारतीय खेळाडूंना ऑफर..!पहा काय आहे प्रकार..!व्हिडीओ व्हायरल..!

T20 Live… भारत पाकिस्तान सामना सुरू होण्याआधी पाकिस्तान ने दिली भारतीय खेळाडूंना ऑफर..!पहा काय आहे प्रकार..!व्हिडीओ व्हायरल..!

दुबई भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ह्या व्हिडिओ मुळे प्रचंड खळबळ माजली असून नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवलीआहे.हा व्हिडिओ २३ ऑक्टोबरचा असून या व्हिडिओत टीम इंडियाचा मेंटर एम.एस. धोनी आणि फलंदाज के.एल. राहुल यांना मॅच गमावण्याची खुली ऑफर दिली आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की सराव केल्यानंतर दोघेही मैदानावरून हॉटेलकडे जात असताना एका पाकिस्तानी महिला पत्रकाराशी झालेला हा संवाद आहे.त्यात धोनीनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.
टीम इंडिया आपला सराव संपवून परतत असताना पाकिस्तानची अँकर सवेरा पाशाने हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. तिला प्रथम के.एल. राहुल दिसला आणि राहुलला पाहताच पाकिस्तानी अँकरने त्याला पाकिस्तानविरुद्ध चांगली फलंदाजी करू नको अशी विनंती केली. पाक अँकरने असे २-३ वेळा सांगितल्या नंतर राहुलने तिच्याकडे पाहिलं आणि हसत पुढे निघून गेला.

मागून धोनी देखील येत होता. सवेराने धोनीकडे गेली पण धोनी राहुलसारखा गप्प बसला नाही. त्याने सवेरा पाशाला चोख प्रत्युत्तर दिले. धोनी म्हणाला की, ‘आमचं कामच असं आहे.’ धोनीने कुणाचं नाव घेतलं नाही, पण त्याचा इशारा पाकिस्तानकडे होता. पाकिस्तानला पराभूत करण्याचं काम आहे, असं त्याला म्हणायचे होते.हे सर्व प्रकरण फार गंभीर नसून मजेशीर आहे पण नेटकरी मात्र कामाला लागले आहेत.

आता मात्र सामना गमावल्या नंतर मात्र पुन्हा टीका सुरू झाल्या आहेत.त्यातल्या त्यात राहुल काहीच न करता आऊट झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button