Solapur

स्वच्छ शाळा – सुंदर शाळा स्पर्धेमध्ये केंद्र अरण चे घवघवीत यश  तालुका स्तरावर चार शाळांनी पटकावला नंबर

स्वच्छ शाळा – सुंदर शाळा स्पर्धेमध्ये केंद्र अरण चे घवघवीत यश तालुका स्तरावर चार शाळांनी पटकावला नंबर

सोलापूर : दि १५ .. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या स्वच्छ शाळा- सुंदर शाळा अभियान अंतर्गत स्पर्धेचे जुलै महिन्यापासून आयोजन करण्यात आले होते. चार गटातून तालुका स्तरीय वेगवेगळ्या चार पथकांनी शाळा पडताळणी करून निवड करण्यात आली. केंद्र अरण चे केंद्र प्रमुख डॉ. विलास काळे यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली चार शाळांनी माढा तालुका स्तरावर घवघवीत यश मिळवले. गट..द्विशिक्षकी शाळा इयत्ता १ ली ते ४थी/५ वी.. जि.प.प्रा. शाळा, गायकवाड वाडी (अरण) तालुका प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवस्ती तालुका द्वितीय क्रमांक (अरण), गट.. वरिष्ठ उच्च प्राथमिक शाळा १ ली ते ७/८ वी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण माढा तालुक्यातून प्रथम क्रमांक, गट.. खाजगी माध्यमिक शाळा.. संत सावता माळी विद्यालय अरण तालुका स्तर द्वितीय क्रमांक पटकाविला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण सोलापूर जिह्यात १२ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत स्वच्छ शाळा – सुंदर शाळा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.१५ सप्टेंबर नंतर तालुकास्तरीय कमिटी मार्फत शाळांची तपासणी करून १०० गुणांची छाननी करण्यात आली.
यामध्ये शाळा- वर्ग खोल्या सजावट, बोलक्या भिंती, शैक्षणिक साहित्य, मुख्याध्यापक कार्यालय, एक पद- एक वृक्ष,कुंडीतील लागवड,परसबाग,प्रयोगशाळा,ग्रंथालय, ई- लर्निंग साहित्य, कचरा व्यवस्थापन,वर्गखोल्या,म.न.रे.गा.अंतर्गत कामे,लोकवर्गणी,शौचालय,सरंक्षक भिंत इ २९ निकषावर आधारीत असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटातून चुरस निर्माण झाली होती. १२ जुलै पासून सर्वच शिक्षकांनी या २९ निकषावर आधारित सर्व कामे पूर्ण केली. केंद्र अरण मधील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी ६,५०,००० रुपये लोकसहभागातून शाळा विकास निधी उभा करून शाळांची रंगरंगोटी, बोलक्या भिंती, सरंक्षक भिंत रंगरंगोटी सह विविध भौतिक सुविधां निर्माण केल्या. या शाळेतील सर्व शिक्षकांनी स्वतःचे १,००,००० रु खर्च केले. वर्गखोल्या इतर सुविधा कामे केली. शाळेच्या परिसरात झाडे, कुंडीतील फुलझाडे, परसबाग अंतर्गत भाजीपाला औषधीवनस्पती,प्रयोगशाळा,ग्रंथालय, संरक्षक भिंत बांधकामासह रंगरंगोटी, फ्लेवर ब्लॉक सह लॉन गवत, अद्यावत शौचालय व इतर सर्व निकषावर आधारित सर्व कामे अगदी नियोजनपूर्वक पूर्ण केली.अतिशय सुंदर मुख्याध्यापक कार्यालय, कचरा व्यवस्थापन, मैदानाचे सपाटीकरण इ सर्व कामे पूर्ण केली. वरील चार गटातून माढा तालुक्यात चार शाळांनी अरण केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ. विलास काळे यांचे मार्गदर्शनाखाली घवघवीत यश मिळवले.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण मुख्याध्यापक श्रीमती शांता वाघमोडे, गायकवाड वाडी मुख्याध्यापक श्रीमती सुनीता राडकर, माळी वस्ती मुख्याध्यापक श्री. सोपान मोहिते, संत सावता माळी माध्यमिक विद्यालय अरण मुख्याध्यापक श्री. हरिदास रणदिवे यांचा व विजेत्या शाळेतील सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार ग्रामपंचायत अरण व सावता महाराज अन्नछत्र मंडळ अरण च्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती चे कार्यकुशल अध्यक्ष, सदस्य, अरण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, पालक, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी मोलाचे योगदान दिले.या स्पर्धेतील यशाबद्दल भारत आबा शिंदे जिल्हा परिषद सदस्य, श्री.शिवाजी राजे कांबळे,ॲड. विजय शिंदे, मा.सरपंच ताकतोडे ताई, उप अभियंता, गटशिक्षणाधिकारी मा. मारुती फडके साहेब, अरण केंद्रांचे केंद्रप्रमुख डॉ.विलास काळे, यशवंत दादा शिंदे, ग्रामसेवक हारगे यांनी सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले. जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button