Faijpur

फैजपूर येथे लेवा समाजाचे सकल लेवा जनजागृती अभियान यशस्वीपने संपन्न

फैजपूर येथे लेवा समाजाचे सकल लेवा जनजागृती अभियान यशस्वीपने संपन्न

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपुर येथील धनाजी नाना महाविद्यालयात रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी लेवा समाजाचे सकल लेवा जनजागृती अभियान उत्साहात संपन्न झाले. लेवा समाजातील वेगवेगळे तीन प्रवाह व पोटजाती यांना एकत्रित करून एकसंघ सकल लेवा समाजाची उभारणी व्हावी व त्या माध्यमातून मजबूत संघटन निर्माण व्हावे यासाठी लेवा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले यासोबत भविष्यकाळात समाजातील तरुणांमध्ये सामाजिक कर्तव्याची जाणीव विकसित होण्यासाठी व सामाजिक स्तरावर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
समस्त लेवा पाटीदार समाजातर्फे व जळगाव जिल्ह्यातील विविध सतरा मंडळामार्फत सदर अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक मा श्री रमेश विठू पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून रावेर मतदार संघाचे विद्यमान आमदार मा श्री शिरिषदादा चौधरी हे होते. 1984 मध्ये स्वर्गीय बाळासाहेब चौधरी यांनी या एकत्रीकरण अभियानाला सुरुवात केली होती याची आठवण कुटुंब नायक श्री रमेश विठू पाटील यांनी करून दिली तसेच लेवा पाटीदार समाज हा गुजरात मधून स्थलांतरित होऊन इकडे वसलेला आहे त्यामुळे समाज बांधवांची संख्या कमी असल्याने या जातीचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये करण्यात स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याच्या आठवनीला उजाळा देण्यात आला. तर मा श्री शिरिषदादा चौधरी यांनी लेवा समाजातील सर्व पोटजाती एकत्रित करण्याचे काम कठीण आहे तेवढेच सोपेही आहे असे सांगितले व त्यासाठी मधूस्नेह परिवारातील सर्व सदस्यांचा कार्यशील सहभाग राहील याचे आश्वासनही दिले.
सदर अभियानात चार सत्रांमध्ये वेगवेगळ्या वक्त्यानी आपापले विचार मांडलेत. प्रथम सत्रामध्ये मा श्री सुरेशदादा जावळे, डॉ ज्ञानेश्वर पाटील, डॉ पी आर चौधरी, प्राचार्य धनाजी नाना महाविद्यालय यांनी विचार मांडले व संघटनेची गरज विशद केली.
दुसऱ्या सत्रात मा ज्योतीताई महाजन, श्री किसन वराडे, सौ नीला चौधरी यांनी लेवा संघटनेचे महत्व व फायदे याबद्दल आपल्या भूमिका व्यक्त केल्या.
तिसऱ्या सत्रात श्री निळकंठ चौधरी, श्री भास्कर चौधरी, श्री अरुणदादा बोरोले यांनी संघटन कशा प्रकारे केली जाईल व त्याचे मार्ग याबद्दल सविस्तर माहिती दिली.
तर चतुर्थ सत्रात डॉ प्रमोद महाजन, अँड ज्योतीताई भोळे यांनी लेवा समाज एकत्रीकरण याबद्दल आपापली मते व्यक्त केली. या अभियानासाठी नीता वराडे, नितिन इंगळे, चंद्रकांत बेंडाळे, डॉ मिलिंद पाटील, मा श्री लीलाधर चौधरी, गीताताई चौधरी, सौ अरुणाताई चौधरी, दिनेश भंगाळे, तसेच पुणे , मुंबई आणि नाशिक येथून आलेल्या मान्यवरांनी परिश्रम घेतले. चर्चासत्रांत श्री विजय महाजन, डॉ जी पी पाटील, डॉ के जी पाटील, श्री किशोर चौधरी, श्री नंदू पाटील सर , श्रीकांत चौधरी, यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी सौ महानंदाताई होले नगराध्यक्ष फैजपुर, सौ अनिताताई येवले नगराध्यक्ष सावदा, केतन किरंगे, दीपाली झोपे, प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, प्राचार्य डॉ आर एल चौधरी, श्री अजितदादा पाटील, सुप्रसिद्ध लेखक श्री व पु होले सर, श्री राजेंद्र चौधरी यासोबत असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्रमुख वक्ते यांच्या परिसर विद्या मंडळ फैजपुर चे उपाध्यक्ष मा प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री मिलिंद बापू वाघुळदे, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव प्रा नंदकुमार आसाराम भंगाळे, मा मार्तण्ड भीरुड, मा ओंकार वामन सराफ, डॉ एस एस पाटील, मा संजयदादा चौधरी हे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा श्री प्रभातदादा चौधरी यांनी केले तर खुमासदार सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ सुनिता चौधरी, जळगाव यांनी केले व आभार प्रदर्शन श्री पी एन पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button