Pandharpur

फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय रोलर स्केटिंगमध्ये मारली बाजी

फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय रोलर स्केटिंगमध्ये मारली बाजी

प्रतिनिधी
रफिक आतार

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय रोलर स्केटिंग मध्ये बाजी मारली. आपले शरीर लवचिक राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात त्यापैकीच एक खेळ म्हणजे स्केटिंग. मुलांमध्ये अगदी लहानपणापासून स्केटिंग चे आकर्षण असते .पायाला चाके लावून भन्नाट वेगाने पुढे जाणे असे वाटते पण त्याचेही एक शास्त्र व नियम आहे स्केटिंग हा चपळतेने व कौशल्यपूर्ण खेळ खेळला जातो ,त्यामुळे हात पाय लवचिक होतात त्यामुळे शरीराचा व्यायाम होतो स्केटिंग मुळे चढ किंवा उतार व्यवस्थित तोल सांभाळून पार शकतो .मोडनिंब येथे राज्यस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये इयत्ता तिसरी मधील कु.असावरी अमोल नलवडे व कु. आर्यन अभिजीत नलावडे या दोघांना प्रथम क्रमांक मिळाला तसेच कु.अस्मिता प्रकाश फाटे हिला चौथा क्रमांक मिळाला तसेच .कु .परी गणेश खंडागळे हिला पाचवा क्रमांक मिळाला .या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडाशिक्षक श्री पंचाक्षरी स्वामी यांनी केले. संस्थेचे मॅनेंजिंग डायरेक्टर श्री.दिनेश रूपनर यांच्या हस्ते विदयार्थाचा सत्कार करून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रूपनर यांनी विद्यार्थाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या सर्व विद्यार्थ्यांचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button