Pandharpur

भाळवणीत प्रामाणिकपणाचे दर्शन 175000 रुपयांची रक्कम परत

भाळवणीत प्रामाणिकपणाचे दर्शन 175000 रुपयांची रक्कम परत

प्रतिनिधी
रफीक अत्तार

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील किराणा व भुसार मालाचे व्यापारी रवींद्र धोंडीराम कारंडे हे नेहमीप्रमाणे युनियन बँकेत पैसे जमा करण्यासाठी आले असताना गडबडीत पैसे असलेली बॅग बँकेत विसरून गेले.नंतर अडीच ते तीन तासा नंतर कारंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेत धाव घेतली त्यावेळी बँकेत कर्मचारी असलेला प्रसाद महाजन यांनी सदर रक्कम असलेली पिशवी सुरक्षितपणे युनियन बँकेचे मॅनेजर बनसोडे यांच्याकडे सुपूर्द करून ठेवली होती. सदर रककमेची खातरजमा करून रवींद्र कारंडे यांना 175000 रुपयांची रक्कम सुपूर्त करण्यात आली.
यावेळी कृषी अधिकारी गणेश सावंत, कॅशियर विशाल बिराजदार ,शिक्षक रामचंद्र सावंत, प्रशांत माळवदे,अरुण लिंगे, बापू वाघमारे,नवल कलढोणे,शक्तिकुमार माने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी रवींद्र कारंडे यांनी बक्षीस म्हणून 5000 रुपये देऊ केले पण ती रक्कम कोणीही स्वीकारली नाही.
या प्रामाणिकपणाबद्दल प्रसाद महाजन याचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button