Amalner

शिरूड परिसरात शासनाच्या नियमांचे उल्लंघन पोलीस प्रशासनची गाडी गेली असता पुन्हा गर्दीचा माहोल

शिरूड परिसरात शासनाच्या नियमांचे उल्लंघन पोलीस प्रशासनची गाडी गेली असता पुन्हा गर्दीचा माहोल

रजनीकांत पाटील
अमळनेर तालुक्यातील शिरूड परीसरातील नागरिकांनी आता शासनाच्या नियमाला धाब्यावर बसवले आहे जगभरात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले असता कोरोना आजार आपल्या गावाजवळ 8 किलोमीटर अंतरावर येऊन ठेपला असून कोणीही खबरदारी घेतांना दिसत नाही या बाबत नाही तर गावात तोंडाला मास्क न लावता गल्लो गल्लीत 10 ते 15 नागरिक पेक्षा अधिक नागरिक घोळके घालून उभे असतात तसेच दिवसा ढवळ्या देखील गावातील काही वयोवृद्ध जेष्ठ नागरिक गावच्या चावडी वर येऊन बसतात मात्र या बाबत कुठलीही कारवाही होत नसल्याने चे दिसत आहे तसेच गावातील येणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या गाडीला बघून पळ काढतात व गाडी गावातून निघून गेल्यावर अधिक जास्त गर्दी जमा होऊन चर्चा करतात तोंडाला मास्क देखील नसते या मुळे लॉक डाउन चा नियम तोडत सोशल डिस्टन्स चा फज्जा उडत आहे.या बाबत गावातील सरपंच, पाटील यांच्या कडून कोणत्याही प्रकारचा आढा बसत नसल्याने पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button