Pandharpur

पंढरीत गुणवंताचा सत्कार आस्था माने या विद्यार्थिनीला, पंढरी रत्न पुरस्कार..

पंढरीत गुणवंताचा सत्कारआस्था माने या विद्यार्थिनीला, पंढरी रत्न पुरस्कार..

प्रतिनिधी
रफीक अत्तार

पंढरीत गुणवंतांचा गौरव:S.S.C. बोर्डात महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली पंढरपूर शहरातील कु. आस्था अजित माने या युवतीला माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते ‘पंढरी रत्न’ पुरस्कार, तर तिचे शैक्षणिक गुरु प्रशांत वांगीकर सर यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान करत विशाल आर्वे मित्रमंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.माजी नगरसेवक शैलेश बडवे, निलराज डोंबे, समाजसेवक भागवत बडवे, ऍड. ओंकार जोशी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के सर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उत्तुंग यशाच्या माध्यमातून कु. आस्था माने व प्रशांत वांगीकर सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात पंढरपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, अशा शब्दांत प्रशांतराव परिचारक यांनी सत्कारमूर्ती यांचे कौतुक करत, त्यांचे अभिनंदन करण्याबरोबरच पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विशाल आर्वे व त्यांचे सर्व सहकारी यांचेदेखील विशेष कौतुक केले. डॉ. प्रवीदत्त वांगीकर यांनी यावेळी समायोचित भाषण केले. सत्कार स्वीकारल्यानंतर कु. आस्था माने व वांगीकर सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल आर्वे यांनी केले. तर सूत्रसंचालन व शेवटी उपस्थितांचे आभार राहुल आर्वे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारंग दिघे, श्रीनिवास उपळकर, तुकाराम खंदारे सर, गणेश देशपांडे सर, सुरज पडवळकर, माऊली लाडवाणी, अरविंद गुंड, रणजीत माने, रोहित माने, प्रितम भोसले, नितीन व्हावळ आदीजणांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button