Akola

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील वैयक्तिक लाभाच्या योजना चालू करणे बाबत निवेदन

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील वैयक्तिक लाभाच्या योजना चालू करणे बाबत निवेदन

अकोला प्रतिनिधी:- _विलास धोगंडे

महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते. २१ व्या शतकात ज्याला आपण विज्ञान तंत्रज्ञानाचे संगणकाचे युग म्हणतो. यावर्षी आपण स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आजही खऱ्या अर्थाने पाहिजे तसा स्वातंत्र्याचा प्रकाश आदिवासी पर्यंत पोहोचला नाही. तसेच आजही आदिवासी समाजापर्यंत या वैयक्तिक योजना पोहोचत नाहीत. आदिवासी आजही उपेक्षितांचे जीवन जगत आहे. वस्तुस्थितीकडे लक्ष दिल्यास विकासापासून कोस दूर आहे. किती विकास योजना प्रभावीपणे राबविल्या जातात ? किती योजना गरीबापर्यंत पोहोचलेल्या ? आदिवासींचा खरा विकास किती झाला.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय मार्फत हलके वाहन चालवणे प्रशिक्षण, कंडक्टर बॅच काढून देणे, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणे, दुकान सुरू करण्यासाठी अर्थसहाय्या देणे, शेळी गट वाटप करणे, शेती पूरक तुषार सिंचन अर्थसहाय, घरकुल योजना ,रस्ते दुरुस्ती, विद्युतीकरण, महिलांना शिवण यंत्र, ऑइल इंजिन, पिव्हिसी पाईप, दुधाळ जनावरे, ताडपत्री, बचत गटासाठी प्रशिक्षण योजना, भजनी मंडळ साहित्य ,मंडप, महिलांना शिवण यंत्र या सर्व योजना चालू करण्यात यावे म्हणून अशी मागणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला येथे बिरसा उलगुलान सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर यावेळी बिरसा उलगुलान सेनेचे उपस्थित पदाधिकारी मा.विलास धोंगडे(जिल्हाप्रमुख अकोला ), मा. महादेव नामदेव जामकर (उपजिल्हाप्रमुख), मा. प्रमोद रमेश कदम (तालुकाप्रमुख), आर. कदम, सागर पांडे ,अनिल डुकरे, नवनाथ शिंदे, रामदास धोंगडे, विठ्ठल शिंदे, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती आज रोजी प्राप्त झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button