Nashik

बलात्कारी भोंदूबाबाला कठोर शिक्षा करण्यासाठी तहसीलदार यांना भा.ज.पा युवा मोर्चाच्या वतीने निवेदन

नासिक जिल्हयातील येवल्यात
बलात्कारी भोंदूबाबाला कठोर शिक्षा करण्यासाठी तहसीलदार यांना भा.ज.पा युवा मोर्चाच्या वतीने निवेदन

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

येवला -भोंदूबाबा व त्याच्या भावाचा आईसह दोघी बहिणी वर बलात्कार व धर्म परिवर्तन साठी बळजबरी केल्या बद्दल कठोर शिक्षा करावे यासाठी येवला तहसीलदार प्रमोद हिले यांना भारतीय जनता युवा मोर्चा वतीने मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज व शहराध्यक्ष तरंग गुजराथी निवेदन
लग्न जमविण्याच्या आमिष दाखवून आईसह दोघि बहिणीवर बलात्कार करून धर्म परिवर्तनासाठी भोंदू बाबा ने प्रवृत्त केले अशी शहर पोलिसात पीडिताने फिर्याद दिली असून नागडे येथील सुखी अब्दुल अजीज बाबा व त्याचा भाऊ एडवोकेट जब्बार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे व या दोघांनी आजुन किती लोकांना फसवले आहे, किती लोकांवर अत्याचार केला आहे याची सखोल चौकशी व्हावी व पीडितांना न्याय द्यावा वरील आरोपीस कठोर शिक्षा व्हावी. मुलींना फसवून अत्याचार वारंवार देशामध्ये होत आहे.सदर आरोपी दोघे भाऊ असून एक भाऊ सुशिक्षित वकील आहे त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झालेला आहे यांना कठोरात कठोर शिक्षा नाही झाली तर अशा लोकांना आणखी हिम्मत येईल त्यामुळे सदर आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज व भाजपा शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांनी निवदनाद्वारे केली.
निवेदन देत्यावेळी सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर, कोषाध्यक्ष पुरुषोत्तमजी रहाणे सर, सुनीलजी बाबर, उपाध्यक्ष जितेंद्रजी करेहकर, किशोरजी दगडू, पंकजजी पैलवान आदि पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button