Champa

चांप्यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ग्रामपंचायत कडून विविध उपाययोजना व चांप्यात झाली जंतूनाशक फवारणी

चांप्यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ग्रामपंचायत कडून विविध उपाययोजना व चांप्यात झाली जंतूनाशक फवारणी

अनिल पवार

चांपा ता , २७:कोरोना या जीवघेण्या विषाणुने राज्यात व जिल्ह्यात सर्वत्र कहर केला असून , यावर प्रतिबंधक उपाय म्हणून उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण गावात जंतूनाशक सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाची फवारणी केली .यावेळी सरपंच अतिश पवार , उपसरपंच अर्चना सिरसाम , चांप्याच्या आशा वर्कर अलका घरडे कृष्णा इरपाते ,सुरेंद्र लांबोदरी आदींनी प्रत्यक्षात संपूर्ण गावात फवारणी करून घेतली .तसेच पोस्टर माहिती पत्रक , दवंडीच्या माध्यमातून चांपा ग्रामपंचायत तिन्ही प्रभागात कोरोनाबाबत जनजागृती केली , व सोबतच सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या किराणा दुकान , पिठाची गिरणी , बँक , दवाखाण्यात कोरोना संसर्गाची लागण होऊ नये करिता सर्व दुकानदारांना विशेष सूचना देत दुकानाच्या समोर गर्दी होऊ नये व गावकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत उपाययोजना म्हणून सर्व किराणा दुकानात गावांतील नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी करिता प्रत्येक प्रभागात जी अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू आहेत, त्या दुकानांसमोर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत व्दारे तीन-तीन फुटांवर चौरस आकारातल्या खुणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच ग्राहकांना उभे राहायचे आहे. कोरोनासंदर्भात आवश्यक उपाययोजनांवर ग्रामपंचायत भर देत असून याअंतर्गत ही व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजीपाला विक्रेत्यांना गावात घरोघरी जाऊन सुरक्षित अंतर ठेवत गावांतील नागरिकांना सुरक्षित अंतरावर भाजीपाला पुरवण्यात यावा करिता सर्व दुकानदारांना ग्रामपंचायतमार्फत दवंडी देऊन सुचना देण्यात आल्या .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button