Amalner

?️अमळनेर कट्टा..अन्यायग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांचा पुढाकार

?️अमळनेर कट्टा..अन्यायग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांचा पुढाकार

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील जळोद येथील शेतकरी देवराम चौधरी यांच्या शेता जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने जळोद ते पातोंडा डांबरीकरण रस्ता तयार केला आहे अशी तक्रार संबंधित शेतकऱ्यांची आहे, तरी या रस्त्यामुळे पावसाळ्यात शेतात सम्पूर्ण पाणी साचत असल्याने गेल्या 3 वर्षापासून न्याय मिळेल या अपेक्षेने त्यांनी नियमित संबंधित यंत्रणेच्या मागे लागून पाठपुरावा देखील केला पण त्याचा देखील काही फरक पडला नाही.
शेवटी शेतकरी देवराम चौधरी यांनी दि. 26 जानेवारी 2021 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ खंडारे यांनी शेतकऱ्याची समजुत काढून आत्मदहन करण्यापासून रोखले व अमळनेर तहसीलदार मा.मिलिंद कुमार वाघ,अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,शरद पाटील,मेघराज महाजन यांनी संबंधित अधिकारी व विभागाची लवकरच मिटींग करून असे आश्वासन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button