Maharashtra

अन शरद पवारांनी ओमराजे निंबाळकरांना व्यासपीठावर बोलावून घेतले

अन शरद पवारांनी ओमराजे निंबाळकरांना व्यासपीठावर बोलावून घेतले

प्रतिनिधी सलमान मुल्ला

आजपर्यंत पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांचे विरोधक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी पवार यानी ठराविक अंतर ठेवले होते. मात्र आता त्याच ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी सबंध जोडुन पवार यानी आपल्यापासुन दुर गेलेल्या नेत्याना द्यायचा तो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

उस्मानाबाद :- आपल्याला सोडून गेेलेल्या राष्ट्रवादीच्या अनेक मातब्बरांना उचित संदेश देण्याची संधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कधीही सोडत नाही. याचाच अनुभव काल झालेल्या सोलापूर दौऱ्यावेळी पुन्हा एकदा आला. एका बाजुला विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधकांची भेट घेतली तर दुसरीकडे पद्मसिंह पाटील यांचे विरोधक ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशीही आपुलकीने संवाद साधत पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उस्मानाबादेत बैठक घेतल्यानंतर तिथे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा वाढदिवस साजरा केल्याने तर महाविकास आघाडीत किती सलोखा निर्माण झाला आहे याचे दर्शनही घडवले.

ज्या मातब्बर नेत्यानी राष्ट्रवादीला रामराम ठोकुन भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यांच्या बाबतीत शरद पवार एकदम कठोर झाल्याचे अनेकदा दिसुन आले आहे. जिल्ह्याचा विचार करता जिल्हा परिषद निवडणुकामध्ये जुने सहकारी राणाजगजितसिंह पाटील यांच्याविरोधात शिवसेनेशी आघाडी व स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडी स्थापन करत आपले इरादे स्पष्ट केले होते.

आजपर्यंत पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांचे विरोधक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी पवार यानी ठराविक अंतर ठेवले होते. मात्र आता त्याच ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी सबंध जोडुन पवार यानी आपल्यापासुन दुर गेलेल्या नेत्याना द्यायचा तो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

*सोलापुर येथे आयोजीत केलेल्या आढावा बैठकीत खासदार राजेनिंबाळकर सर्व आमदारासह व्यासपीठाच्या खाली बसले होते. मात्र तेवढ्या लोकप्रतिनिधीमधुन खासदार राजेनिंबाळकर यांना स्वतः पवार यानी व्यासपीठावर येऊन बसण्यास सांगितले. शिवाय अनेकवेळा त्याचा उल्लेख करुन त्यांच्याशी संवाद देखील साधला.*

वाढदिवसही केला साजरा.. त्यानंतर पवार पुढे गेले व *आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार ओमराजे राजेनिंबाळकर एकाच गाडीमध्ये उस्मानाबादकडे आले. जिल्ह्यामध्ये आरोग्यमंत्री यांनी आढावा बैठक घेतली*. त्या बैठकीला जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते, त्यामध्ये स्वतः राणाजगजितसिंह पाटील हे सुध्दा होते. *बैठक संपल्यानंतर खासदार ओमराजे राजेनिंबाळकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यानी शिवसेनेच्या खासदारांचा वाढदिवस साजरा केल्याने त्याची चांगलीच चर्चा सूरु झाली आहे.*

साधारण एका वर्षापुर्वीची जिल्ह्याचे राजकारण कसे होते व आता हे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे, हे पाहिल्यानंतर कोणालाही विश्वास बसणार नाही अशी स्थिती आहे. या अगोदर राणा पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांचे व ओमराजे यांचे सबंधसुध्दा अत्यंत टोकाचे होते.

अगदी लोकसभेच्या निवडणुकीत सुध्दा राज्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी राणा पाटील यांच्या बाजुने पुर्ण शक्तीने उभे होते. पण आता चित्र बदलले असुन राष्ट्रवादीचे मंत्री व खुद्द शरद पवार यांनीच ओमराजेंना जवळ केल्याने महाविकास आघाडीतील संबध अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button