पंढरपूर

सेतूबंध साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

सेतूबंध साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

पंढरपूर (एस एम पोरे)- सेतूबंध प्रतिष्ठान या फिरत्या वाचन चळवळीच्यावतीने यंदा दुसऱ्या वर्षाच्या सेतूबंध साहित्य पुरस्कारांसाठी आवाहन करण्यात येत आहे. मराठी साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी कथा, कविता, कादंबरी अशा तीन साहित्यकृतींना पुरस्कार देण्याचे प्रतिष्ठानच्या नियोजन समितीच्या वतीने ठरले आहे
रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे एकूण पुरस्काराचे स्वरूप आहे.
इच्छुक साहित्यिकांनी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती जानेवारी २०२० अखेर पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवाव्यात.
साहित्यकृती पाठविण्याचा पत्ता –
सूर्याजी हरी भोसले
समन्वयक सेतूबंध प्रतिष्ठान,
मु. पुळूज ता. पंढरपूर
जि. सोलापूर पि.४१३३०४
मो.९५२७३५६२३२

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button