Pune

स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :- वनगळी ता इंदापूर येथील एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विद्या शाखेतील एकूण २० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे .अशी माहिती महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा .राम घोगरे यांनी दिली .
पुणे येथील क्यू स्प्याडर, विप्रो ,इंडोव्हन्स ,इन्फोसिस ,इलीएशन , टी अँड टी इन्फ्रा, खोडियार ग्रुप या नामांकित कंपनीच्या निवड समितीने इंदापूर येथील एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या चालू शैक्षणिक वर्षातील २०२१-२०२२ मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक ३ लाख रु ते ४.५ लाख रु पर्यंत पॅकेज मिळाले . २००९ साली स्थापन झालेल्या एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातुन आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पदावरती नोकऱ्या मिळाल्या आहेत .यापुढे बोलताना प्रा घोगरे असे म्हणाले की विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने , स्थापत्य क्षेत्रातील विविध मान्यवरांचे मार्गदर्शन , स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन , विविध विषयांवरती कार्यशाळा , प्रत्यक्ष साईट व्हिजीट अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे. विद्यालयातील माजी विद्यार्थी देश आणि परदेशात सुद्धा उच्च पदावरती काम करत आहेत, तसेच खूप विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा , सार्वजनीक बांधकाम, नगरपरिषद , पाटबंधारे विभाग अशा अनेक विभागात कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता , सहाय्यक कार्यकारी अभियंता अशा प्रमुख पदांवरती काम करीत आहेत. विभागामधील सर्व प्रयोगशाळा या अत्याधुनिक साधने आणि मशिनरी यांनी सुस्सज अशा आहेत . विभागाच्या माध्यमातून विविध सामाजिक तसेच शासकीय संस्था यांचेसाठी कन्सल्टन्सी आणि मटेरियल टेस्टिंग याची पण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे याचा आजपर्यंत ग्रामीण भागातील बहुसंख्य अशा शासकीय कॉन्ट्रॅक्टर ,इंजिनीअर यांना फायदा झाला आहे . तसेच महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्यूड , कम्युनिकेशन स्किल , टेक्निकल स्किल , विविध आधुनिक सॉफ्टवेअर्स यांचे प्रशिक्षण दिले जाते अशी माहिती स्थापत्य विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा .एम. बी काटकर यांनी दिली. एस बी पाटील महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शिकत असताना रोजगार मिळावा यासाठी महाविद्यालयाने नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत या माध्यमातून सदर कंपन्या अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या पात्र विदयार्थ्यांच्या ऍप्टिट्यूड टेस्ट ,टेकनिकल राऊंड ,मुलाखती इ .घेऊन त्यांना चांगल्या पगाराच्या रोजगाराच्या संधी प्राप्त करून देतात दुसरीकडे एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला देशातील शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेले ‘नॅक ‘ मानांकन सुद्धा प्राप्त आहे.
सदर विद्यार्थ्यांना संबंधित विभागातील सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख , ट्रेनींग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. पी. कांबळे, चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री एस.बी.देवकर तसेच प्राचार्य एस . टी. शिरकांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा .हर्षवर्धन पाटील , सचिव सौ भाग्यश्रीताई पाटील , उपाध्यक्षा मा. अंकिता पाटील-ठाकरे आणि विश्वस्त मा. राजवर्धन पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करूनत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button