Faijpur

बोरखेडा बुद्रुक येथील पोलीस पाटील पदी अरफान तडवी यांची निवड

बोरखेडा बुद्रुक येथील पोलीस पाटील पदी अरफान तडवी यांची निवड

फैजपूर प्रतिनिधी

फैजपूर येथील प्रांत अधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पोलीस पाटील पदाच्या परीक्षेत बोरखेडा बुद्रुक तालुका यावल येथील पोलीस पाटील अरफान तडवी यांची पोलीस पाटील पदाच्य ऑनलाइन परीक्षेत बोरखेडा बुद्रुक तालुका यावल येथे निवड झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले असून दिनांक एक सप्टेंबर पासून त्यांनी आपला पदभार स्वीकारला असून अनेक शासनाच्या अटी शर्तीवर सर्वत्र झालेल्या पोलीस पाटील पदाच्या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण वेळ काम करावे लागणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद केलेले आहे त्या आधारे निवड झालेले उमेदवार शासनाच्या मानधन तत्वावर काम करणार आहे असेही पत्रात नमूद केलेले आहे बोरखेडा बुद्रुक तालुका यावल येथील अरफान रशीद तडवी यांची आरक्षण परवर्ग अनुसूचित जमाती साठी ही जागा राखीव होती त्याचप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत त्यांची निवड झाली आहे येथील प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे त्यांना फैजपुर येथील सामाजिक कार्यकर्ते अरमान तडवी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button