Ahamdanagar

संतनागेबाबा मल्टीस्टेट तर्फे बचत खातेदाराला दोन लाखाचे विमा कवच?

संतनागेबाबा मल्टीस्टेट तर्फे बचत खातेदाराला दोन लाखाचे विमा कवच?

सुनिल नजन अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडे बु. येथे मुख्य कार्यालय असलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात शाखांचे नेटवर्किंग जाळे निर्माण केलेल्या संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखेत बचतखाते असलेल्या खातेदारांना दोन लाखाचे विमा कवच दिले जाते अशी माहिती तिसगाव शाखेचे शाखाअधिकारी आदिनाथ गर्जे यांनी दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाउ काळे यांच्या मार्गदर्शनाखालील या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात नेटवर्किंग शाखांचे जाळे निर्माण केले आहे. तिसगाव ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील शाखेचे बचत खातेदार स्व.बबन सखाराम पुंड यांचा अपघाती मृत्यू झाला होता.त्यांच्या वारसदार पत्नी श्रीमती साखरबाई बबन पुंड यांना नागेबाबा संस्थेच्या वतीने दोन लाखाचा धनादेश तिसगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच काशिनाथ पाटील लवांडे, माजी सरपंच भाउसाहेब लोखंडे, सोसायटीचे चेरमन भारत गारुडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शाखा समन्वयक अनिल कदम,चंद्रकांत स्वामी, विमा प्रमुख स्वप्नील गाडेकर,अमित निंबाळकर, सागर घोगरे,नितीन गोरे,गणेश शिंदे,लवांडे सर, राजू शेख,बापू बागडे,वाबळे यांच्या सह अनेक मांन्यवर उपस्थित होते.हा सोहळा तिसगाव शाखेत संपन्न झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button