Bollywood

Bollywood:शाहरुख खान ची मुलगी सूहाना होणार बच्चन कुटुंबाची सून..!

Bollywood:शाहरुख खान ची मुलगी सूहाना होणार बच्चन कुटुंबाची सून..

मुंबई बॉलिवूड सेलिब्रिटी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामामुळे तर कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे… इतकंच काय तर त्यांच्या डेटिंगच्या तर नेहमीच चर्चा सुरु असतात. दरम्यान, सध्या चर्चा ही स्टार किड्स आणि त्यांच्या खासगी आयुष्याविषयी आहेत. स्टार किड्स हे अभिनय श्रेत्रात पदार्पण तर करत आहेत. आता चर्चा आहे ती शाहरुख खानची लेक सुहाना खानच्या रिलेशनशिपची… सुहना खान ही बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे दिसते.
खरंतर सुहाना आणि अगस्त्य नंदा हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

अमिताभ यांची लेक श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य आणि सुहाना हे दोघेही झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. इतकंच काय तर त्या दोघांनी नुकतीच कपूर कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीत हजेरी लावली होती. त्या दोघांनी कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत का हजेरी लावली असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर अगस्त्य हा राज कपूर यांची लेक रितू नंदा (Ritu Nanda) यांचा नातू आहे. इतकंच काय तर ‘हिंदुस्तान टाईम्स’नं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत अग्स्त्यनं त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सुहाना त्यांची पार्टनर म्हणून ओळख करून दिली आहे.
रिपोर्टनुसार, या दोघांमध्ये ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या सेटवर चांगली मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे एकमेकांसोबत बराच वेळ व्यतीत करतात. इतकंच काय तर ते दोघे त्यांचे नाते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दोघांना इतक्यात त्यांचे रिलेशनशिप सगळ्यांसमोर आणायचे नाही.

शाहरुखची फक्त लेक नाही तर त्याचा मोठा मुलगा आर्यन खान आणि श्वेताची लेक नव्या नवेली नंदाचं देखील नाव जोडण्यात आले होते. ते दोघे एकाच शाळेत शिकत होते. त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाला होत्या. मात्र, एका मुलाखतीत ते दोघे चांगले मित्र असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. सध्या शाहरुख आणि बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. नोरा फतेही आणि आर्यन या दोघांनी एका पार्टीत हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, त्या दोघांपैकी कोणीही या बातमीवर दुजोरा दिलेला नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button