Bollywood

Bollywood Stories: ओहो.. अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम रेखा नसून होती ही मराठमोळी मुलगी… करणार होते लग्न…

Bollywood Stories: ओहो.. अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम रेखा नसून होती ही मराठमोळी मुलगी… करणार होते लग्न…

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि रेखा (Amitabh Bachchan and Rekha) यांची लव्हस्टोरी कोणापासूनही लपलेली नाही. या दोघांमध्येही सिक्रेट प्रेम होतं असं कायम म्हटलं जातं. इतकंच नाही तर आजही या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले की ते उत्तर देताना टाळाटाळ करतात. त्यामुळे या दोघांच्या प्रेमाविषयी, त्यांच्या ब्रेकअपविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. पण तुम्हाला माहिती आहे का रेखा आणि जया बच्चन यांच्या आधी एका मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडले होते बिग बी. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया ही लव्हस्टोरी.

खूप लोकांना वाटते की, अमिताभ यांचं पहिलं प्रेम रेखा आहेत. रेखा आणि जया यांच्या आधी अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक मुलगी आली होती. ती एक महाराष्ट्रीयन मुलगी होती, जिच्यावर बिग बी भाळले होते. अमिताभ बच्चन यांचे मित्र दिनेश कुमार यांनी या नात्याचा खुलासा केला होता. दोघांची भेट थिएटरमध्ये एका नाटकादरम्यान झाली आणि हे नातं जवळपास तीन वर्षे टिकले.

त्यावेळी अमिताभ बच्चन कोलकात्यातील एका कंपनीत काम करत होते, त्यादरम्यान ते प्रेमात पडले होते. त्या मुलीचं नाव चंदा होते. बिग बींना तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र काही कारणामुळे तसं होऊ शकलं नाही. अमिताभ कोलकात्यातील नोकरी सोडून मुंबईत आले. नंतर त्या मुलीने बंगालीतील प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न केलं.

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर दोघांनी पहिली भेट १९७० साली पुण्यातील फिल्म इंस्टिट्युटमध्ये झाली होते. अमिताभ यांची पर्सनॅलिटी जया यांना खूपच भावली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन स्ट्रगल करत होते. मात्र त्यावेळी जया बच्चन या स्टार होत्या. त्यानंतर जेव्हा त्या दोघांची भेट गुड्डी चित्रपटाच्या सेटवर झाली तेव्हा ते खूप चांगले मित्र बनले होते. गुड्डीनंतर त्या दोघांनी एकत्र एक नजर चित्रपटात काम केले. त्यानंतर त्या दोघांच्या प्रेमकथेला सुरूवात झाली होती.

जंजीर सिनेमा हिट झाल्यावर दोघांना एकत्र लंडनला फिरायला जायचं होतं. हरिवंश राय बच्चन यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी दोघांना एकत्र पाठवण्यास मनाई केली. त्यांचे म्हणणे होते की अमिताभ बच्चन लग्न न करता कोणत्याही मुलीसोबत बाहेर फिरायला जाणार नाही. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी जया यांना लग्नासाठी प्रपोझ करण्याचा विचार केला. अमिताभ यांनी प्रपोझ केल्यानंतर जया यांनी त्यांना होकार देण्यास वेळ घेतला नाही. त्या दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला. ३ जून, १९७३ साली ते दोघे विवाहबंधनात अडकले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button