Indapur

इंदापूरमध्ये नगराध्यक्ष चषक 2020 क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

इंदापूरमध्ये नगराध्यक्ष चषक 2020 क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील शंभर फुटी रोड शेजारील नगरपालिका मैदानामध्ये लॉयन हार्ट क्रिकेट क्लबच्या वतीने ‘नगराध्यक्ष चषक 2020’ डे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले.

पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये 32 संघाने सहभाग घेतला असून स्पर्धेतील विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.या स्पर्धेच्या उदघाटनाच्या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे आणि लातुरे साहेब, अण्णा पवार उपस्थित होते.या स्पर्धां मधील विजेत्या संघासाठी भरत शहा, ॲड. समीर मखरे, अलताफभाई शेख, महेंद्र रेडके, अशोक इजगुडे, योगेश कांबळे, पोपट शिंदे, विशाल रणवरे, डॉ. बोंगाणे यांनी विजेत्यासाठी बक्षीस जाहिर केले आहे.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रदीप चव्हाण, वसिम शेख, अतिक पठाण, संदीप जमदाडे, शरद शिंदे, अजिनाथ शिंदे, अमोल माने या आयोजकांनी उत्तम नियोजन केले.सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. विनायक लोंढे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button