Amalner

धुळे येथील जवानाची पिस्तुल दाखवून लूट..!अमळनेर जानवे रस्त्यावरील घटना..!

धुळे येथील जवानाची पिस्तुल दाखवून लूट..!अमळनेर जानवे रस्त्यावरील घटना..!अमळनेर येथे मयतास आलेल्या धुळे येथील SRFP जवानास पिस्तुल चा धाक दाखवून लुटून रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात फिर्यादी अवेज अश्फाक शेख अविष्कार कॉलनी चाळीसगाव रोड धुळे,यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतीत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी पत्नी मुला बाळासह राहतो व SRPF क्र 6 धुळे येथे नोकरीस आहे.
दि 25 रोजी हाजी गणी रा अमळनेर मयत झाले म्हणूनन अमळनेर येथे आलो असताना अंत्यविधी कार्यक्रम आटोपून रात्री 10.30 मी सुमारास अमळनेर कडून धुळे कडे जाण्यासाठी जात असताना धुळे रस्त्यावरील जानवे गावाच्या अलीकडे सुमारे 10.45 वा मोटर सायकल क्र MH18 AB 1365 ह्या मोटरसायकल ने जात असताना मागून मोटरसायकल स्वार ट्रीपल सीट बसलेले इसमांपैकी एकाने थांब असा आवाज दिला परंतु दुर्लक्ष करून गाडी चालवत होतो तेंव्हा त्यांच्यातील एकाने गाडीला लाथ मारली गाडीला बॅलन्स गेल्याने रस्त्याच्या कडेला थांबविली व खाली उतरलो असता त्यावेळी तिन्ही इसम एक इसम वय 25 ते 30 वर्ष सडपातळ बांधा उंची 5 फूट 5 उंच शर्ट पॅन्ट घातलेला पिस्तुल सारखी वस्तू माझ्या डोक्याला लावली व मोबाईल पैसे हिसकावून घेतले पाकीट चोरून घेतले. पाकिटात 3000 रु रोख HDFC, SBI चे ATM कार्ड व ड्रायव्हिंग लायसन व इतर ओळखपत्र होते. तसेच मोटरसायकल ची चाबी काढून घेतली यावेळी विरोध केला असता दुसरा इसम 20 ते 22 वर्ष टी शर्ट व पॅन्ट घातलेला कमरेस धरून त्याच्या कडील चाकु कमरेला लावून mi कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला.तसेच बोटातील चांदीची अंगठी काढून घेतली. तिसरा इसम 20 ते 25 याने लाकडी दांड्याने मारले लाल रंगाच्या मोटरसायकल ने निघून गेले.तिन्ही इसम मराठी भाषिक होते.अमळनेर पोलीस ठाण्यातअज्ञात चोरट्यांवर कलम 394,323,506,34 आर्म 3/25 गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास गंभीर शिंदे हे करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button