Pune

सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुतर्फा झाडे झुडपे छाटणी करण्याची मागणी – ट्रायबल फोरम मावळ

सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुतर्फा झाडे झुडपे छाटणी करण्याची मागणी – ट्रायबल फोरम मावळ

पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ विभागातील व मावळ तालुक्यातील रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडे झुडपे तोडा व अपघात टाळा अशी मागणी मावळ तालुका ट्रायबल फोरम च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे करण्यात आली.

ट्रायबल फोरम पुणे जिल्हा विभागीय उपाध्यक्ष मारुती खामकर गुरुजी सरपंच किवळे कशाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा ट्रायबल फोरम युवक अध्यक्ष विक्रम हेमाडे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.
या वेळी ट्रायबल फोरम मावळचे उपाध्यक्ष अनंता पावशे सरपंच खांडी, अध्यक्ष सरपंच संघटना मावळ मार्गदर्शक मा. नामदेव गोंटे सरपंच सावळा, फोरमचे प्रसिद्धी प्रमुख मधुकर कोकाटे, फोरमचे संघटक हिरामण हेमाडे, विभागीय अध्यक्ष किसन गवारी,
ट्रायबल फोरम पुणे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव गभाले माजी सरपंच वडेश्वर, ट्रायबल फोरम मावळ युवकाध्यक्ष रविंद्र काठे आदी नागरिक व ट्रायबल फोरम मावळ चे पदाधिकारी उपस्थित चर्चा करून निवेदन देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button