चिमूर,चंद्रपूर

रावण्या पाटा मधील मोहफुल हातभट्टी वर टाकली धाड ठाणेदार स्वप्नील धुळे यांची कारवाई

रावण्या पाटा मधील मोहफुल हातभट्टी वर टाकली धाड
ठाणेदार स्वप्नील धुळे यांची कारवाई

चिमूर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मासळ रस्ता कडील रावण्या पाट नाला वाहत असून यातील नाल्यात मोहफुल सडवा व हातभट्टी वर धाड टाकून ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी कारवाई करीत 1 लाख 95 हजार रुपयांची मुद्देमाल सह जप्त करून घटनास्थळी नाश केला.

ठाणेदार स्वप्नील धुळे चिमूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक दरम्यान त्यांना वाहतूक नियंत्रण वर देण्यात आले असता निवडणूक संपल्यावर चिमूर पोलीस स्टेशन ला ठाणेदार धुळे रुजू होताच त्यांनी मोहफुल हात भट्टी चा सुगावा लागताच रावण्या पाटात धाड टाकली त्यात 7 प्लास्टिक ड्रम मधील मोहा सडवा आढळले मोहसडवा सह मुद्देमाल 1 लक्ष 95 हजार रुपयांचा जप्त करण्यात येऊन घटनास्थळी सडवा नाश करण्यात आला
या कारवाईत केसलापुर येथील ईश्वर नान्हे मनोज मोहिणकर रुपेश मोहिणकर यांचे वर कलम 65 फबक नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाले.
पुढील तपास सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button