पंढरपूर

राष्ट्रसंत गाडगेमहाराज स्मृती दिनानिमित्त स्वेरीज् फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राबविले विविध उपक्रम

राष्ट्रसंत गाडगेमहाराज स्मृती दिनानिमित्त स्वेरीज् फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राबविले विविध उपक्रम

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर यांच्या विद्यमाने दिनांक १७ डिसेंबर पासून सुरु झालेल्या राष्ट्रीय सेवा योजने (रासेयो) अंतर्गत तावशी येथे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर मधील विद्यार्थी विद्यार्थीनींनी ग्राम स्वच्छता केली तसेच घरोघरी जाऊन सर्व वयोगटातील ग्रामस्थांना असणाऱ्या विविध आजारांचा अहवाल नोंदवून घेतला व ग्रामस्थांना आहाराबद्दल व उपचाराबद्दल उपयुक्त माहिती दिली. तसेच या शिबिरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे रक्तगट, वजन, उंची तपासणी करण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेतील लहान मुलांना शिक्षणाचे महत्त्व व मार्गदर्शन असे अनेक प्रबोधनपर, संस्करात्मक स्वरूपाचे उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला तावशी ग्रामस्थ देखील सहकार्य करत आहेत. स्वेरी फार्मसीचे रासेयोचे युनिट फार्मसीच्या स्थापनेपासून विविध गावांमध्ये उपक्रम राबवून नागरिकांना स्वच्छतेतून समृद्धीकडे घेवून जाताना शिक्षणाचाच एक भाग असलेले विधायक कार्यक्रम राबविताना समाजसेवेचे काम अविरत करत आहेत. ‘माझ्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी’ या रासेयोच्या ब्रीद वाक्याप्रमाणे काम करत तावशी गावामध्ये स्वच्छतेबरोबरच विविध सामाजिक उपक्रमदेखील राबवण्यात येत आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल, रासयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ.मिथुन मणियार, प्रा.दिपाली वाघ, प्रा.सविता शिंपले, प्रा. युवराज अर्जुन, रासेयोचे विद्यार्थी सचिव स्वप्निल राऊत हे देखील उपस्थित राहून कार्य करत आहेत. या शिबिराचा समारोप येत्या २३ डिसेंबर रोजी होईल. या शिबिराअंतर्गत तावशी गावामध्ये विशेष स्वच्छता मोहीम व आरोग्याविषयी जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमाला तावशी गावाच्या सरपंच सौ.सोनाली यादव, साधना विद्यालयाचे सचिव बाळासाहेब यादव, भुजंगराव यादव, मिलिंद यादव, उपसरपंच अल्लाभाई मुलाणी, धनाजी यादव, पोलिस पाटील कबीर आसबे, पांडुरंग सूर्यवंशी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल शिखरे, भोसले, बनसोडे, गाढवे आदी शिक्षक वर्ग यांची मदत लाभली.
छायाचित्र- राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर मधील विद्यार्थी विद्यार्थीनींनी तावशीत ग्राम स्वच्छता केली तसेच विविध आजार व त्यावर उपचार याबाबत मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button