Arondol

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत तसेच शिवजयंती उत्सव निमित्त एरंडोल नगर पालिकेतर्फे रांगोळी चित्रकला निबंध स्पर्धेचे आयोजन

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत तसेच शिवजयंती उत्सव निमित्त एरंडोल नगर पालिकेतर्फे रांगोळी चित्रकला निबंध स्पर्धेचे आयोजन

विक्की खोकरे एरंडोल

एरंडोल : एरंडोल नगर पालिका हॉल मध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत तसेच शिवजयंती उत्सव निमित्त रांगोळी चित्रकला निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सर्व स्पर्धा मिळून एकूण 130 स्पर्धक सहभागी झाले होते.रांगोळी स्पर्धेचे परीक्षण रा. ति काबरे विद्यालय मुख्याध्यापक सौ. मानुधने मॅडम, माध्य.विद्या मंदिर सौ.विसपुते मॅडम, प्रोग्रेसिव eng. स्कूल बोहरी मॅडम,न्यू इंग्लिश स्कूल च्या विंचूरकर मॅडम यांनी केले आहे.रांगोळी स्पर्धेकरीता एकूण तीन बक्षीस जाहीर केले असून त्यामध्ये प्रथम क्रमांक बलराम मो.परदेशी यांच्या स्वच्छतेकडे समृद्धीकडे या रागोळीला मिळाला आहे.तसेच द्वितीय क्र योगेश्वरी गजानन वाघ कोरोणा एक अदृश्य शत्रू,तृतीय क्र सागर नारायण शिंपी यांच्या हरित शहर या रांगोळीला मिळाला आहे.तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आले होते त्यामध्ये प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस आश्विनी भिकण वाल्डे पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे सवर्धन ,द्वितीय उत्तेजनार्थ पायल कुंदनसिंग ठाकूर कोरोना एक अदृश्य शत्रू याला दिले आहे.सर्व सहभागी स्पर्धकांना गिफ्ट वाटप करण्यात आले.बक्षीस वितरण कार्यक्रम लवकरच होत असून सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र शाळेनिहाय पोहच करण्यात येतील.चित्रकला व निबंध स्पर्धा चे परीक्षण सुरू आहे. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशासिंग परदेशी,नगरसेवक नितीन महाजन,मनोजभाऊ पाटील,अभिजितदादा पाटील,डॉ.नरेंद्र ठाकूर ,किरण देशमुख मुख्याधिकारी,हितेश जोगी नोडल अधिकारी माझी वसुंधरा अभियान,अनिल महाजन,विकास पंचबुधे, योगेश सुकटे,प्रियंका जैन,देवेंद्र शिंदे,अजित भट,विनोदकुमार पाटील,यामिनी जटे,संजय धमाळ,महेंद्र पाटील ,आनंद दाभाडे,सुरेश दाभाडे, दीपक गोसावी व सर्व नप कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button