Amalner

“जीवंत माणसांच्या प्रेत यात्रा बघून पाऊस ही ढसा ढसा रडला”

“जीवंत माणसांच्या प्रेत यात्रा बघून पाऊस ही ढसा ढसा रडला”प्रतिनीधी, प्रविण काटे-जळगाव जिल्ह्यात काही दिवसापासून पाऊसाने दडी मारली होती. पिके जोर धरत असताना पाऊसाने दडी मारल्या मुळे शेतकऱ्यांच्या तोंडी येणार घास देखील पाऊसाने हिरावून घेतल्याने जळगाव जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.याचा सगळयात जास्त आर्थिक फटका शेतकऱ्याना बसला.आधीच कोरोना मुळे आर्थिक परिस्थिती खालावली असताना त्यात अजून दुष्काळाची भर त्यामुळे शेतकर्यांची आवक, जावक ही बंद झाली अक्षरशः दुबार पेरणी करून देखील मातीत टाकेलेलं बियाणे सुद्धा पावसामुळे उगवले नाही. शेतकरी अगदी मरणाच्या दारी येऊन पोहचला. जुन्या रुढी, व परंपरा ना अंगिकारत खेड्या गावात जीवंत प्रेत काढून पाऊस पडावं म्हणून पाऊसाला साकडे घालण्यात आले आणि हे बघून कदाचित पावसालाही रडू आल असेल आज दिवस भर पाउसाने जळगाव जिल्ह्यात हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचा तोंडावर हास्य उमटले.

संबंधित लेख

Back to top button