Mumbai

?️बॉलिवूड Breaking… ड्रामा क्वीन एकता कपूर वयाच्या 45 व्या वर्षी अडकणार विवाह बंधनात..!जाणून घ्या कोण आहे भावी पती..!

?️बॉलिवूड Breaking… ड्रामा क्वीन एकता कपूर वयाच्या 45 व्या वर्षी अडकणार विवाह बंधनात..!जाणून घ्या कोण आहे भावी पती..!

मुंबई मुंबई नगरीतील बॉलिवूड आणि येथील सितारे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात.अत्यन्त प्रसिद्ध आणि ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूर विविध कारणांसाठी नेहमी चर्चेत असते.प्रसिद्ध अभिनेते डांसिंग जम्पिंग जॅक म्हणून ओळख असलेले जितेंद्र यांची कन्या किंवा तुषार कपूर ची बहीण या पेक्षा ही हॉट, नाटकीय प्रसंगांनी युक्त छोट्या पडद्यावर मालिका बनविणारी निर्माती म्हणून एकता ची ओळख अधिक आहे.सध्या एकता वयाच्या 45 व्या वर्षी विवाह करणार असल्याची चर्चा आहे.

ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.नुकताच तिने सोशल मीडियावर एकताचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे. त्यामुळे हा मुलगा नक्की कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एकताच्या लग्नाची देखील चर्चा सुरु आहे.

एकताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत जो मुलगा आहे त्याचे नाव तणवीर बूकवाला आहे. एकता आणि तणवीर हे बेस्टफ्रेंड आहेत. एकता तणवीरसोबत अनेक वेळा फोटो शेअर करताना दिसते. मात्र आता शेअर केलेल्या फोटोमुळे त्यादोघांच्या लग्नाचा चर्चा सरु झाल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

एकताने फोटो शेअर “…आणि आम्ही इथे आहोत, लवकरच तुम्हाला सांगू” अशा आशयाच कॅप्शन दिले आहे. तर तणवीरने देखील त्याफोटोवर कमेंट केली आहे. “या मैत्रीला आता नात्यात बदलण्याची वेळ आली आहे. अशी कमेंट तणवीरने केली आहे.” तणवीरच्या या कमेंटनंतर हे दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत असे म्हटले जात आहे.

एकता ने वयाच्या अवघ्या १९ वर्षांची असताना बालाजी टेलीफिल्म्सची स्थापना केली होती. आज बालाजी टेलीफिल्म्स प्रसिद्धी च्या शिखरावर आहे.

असो एकतास लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा !..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button