Dewala

खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी रूग्ण कल्याण समितीच्या सभे मध्ये सदस्यांचा जाहीर बहिष्कार

खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी रूग्ण कल्याण समितीच्या सभे मध्ये सदस्यांचा जाहीर बहिष्कार

देवळा : खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी रूग्ण कल्याण समितीच्या सभे मध्ये सदस्यांचा जाहीर बहिष्कार
प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी अशा वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या दवाखान्यात एकही अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांना मध्ये संताप

महेश शिरोरे प्राथमिक आरोग्य केंद्र खामखेडा येथील रुग्ण कल्याण समितीच्या मीटिंग वरती व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात समितीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला.गेल्या काही दिवसांपासून येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहेत. २४ तास ड्यूटी असतानाही चक्क अधिकाऱ्यांसह बरेचशे कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्याने खामखेडा ग्रामपंचायत, रुग्ण कल्याण समिती सदस्यांसह वसाकाचे माजी संचालक आण्णा पाटील, शिवसेनेचे प्रशांत शेवाळे,सुनील शेवाळे, संजय मोरे, विश्वास शेवाळे , ग्रामस्थांनी जाहीर निषेध करून बहिष्कार टाकला प्रथम श्रेणी, आणि द्वितीय श्रेणी अशा दोन वैद्यकीय अधिकार्यांच्या जागा असूनही या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी असताना ही एकही अधिकारी उपस्थित राहत नसल्याने खामखेडा ग्रामस्थ आक्रमक झालेले उपस्थित अधिकाऱ्यांना बघावयास मिळाले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी सहा तारखेला रात्री आठ वाजता रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुनील शेवाळे यांना रक्तदाबाचा त्रास व अस्वस्थ ,अशक्तपणा जाणवत असल्यामुळे आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले त्यामुळे त्यांनी तात्काळ तालुका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि काल तात्काळ जिल्हा परिषद सदस्या, व रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा सौ धनश्री ताई आहेर, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे यांच्या उपस्थित रुग्ण कल्याण समितीच्या मीटिंग मध्ये वैद्यकीय अधिकारी यांची तात्काळ बदली करण्यासाठी विश्वास शेवाळे यांनी सूचना मांडली व त्याला अनुमोदन बारकु शेवाळे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ धनश्री ताई आहेर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून ग्रामस्थांना धीर दिला व तात्काळ अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आश्वासन दिले.
खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कामाची ड्यूटी २४ तास असताना देखील शासकीय मुख्यालयात न राहता , दवाखान्यातील मुख्यालय हे रिकामे राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला. दवाखान्यात एका आरोग्यसेविकेवर सर्व दवाखान्याचा भार पडल्याचा प्रकार समोर आला. तसेच वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्ण कल्याण समितीच्या सदस्याला तसेच इथून मागेही अशाच बऱ्याच रुग्णांना उपचाराविना घरी परतावे लागले.

नागरिकांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने स्व. डॉ .दौलतराव सोनुजी आहेर हे आरोग्य मंत्री असताना या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी झाली. आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रास डॉ आनंदीबाई जोशी पुरस्कार बरोबर असे अनेक पुरस्कार मिळाल्या असल्याने जिल्ह्यात नावारूपास आलेल्या खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राची अधिकाऱ्यांसह ,कर्मचाऱ्यांनी दयनीय अवस्था करून ठेवली. लायकेश्वर , मोरेवाडी, फांगदर, स्थळवस्ती,, भउर, सावकी , विठेवाडी, आदी वाड्यावस्त्यांवरील रुग्ण खामखेडा येथे येतात. खेड्यापांड्यांवर आरोग्याच्या सुविधा नसल्याने शिवाय खासगी डॉक्‍टरांची संख्या कमी असल्याने सामान्य रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र आधार ठरते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहेत. २४ तास ड्यूटी असतानाही शासकीय मुख्यालय रिकामे राहते , रूमचा दरवाजा लावून घरी जात आहेत. हा प्रकार सोमवारी (ता. ६ ) उघडकीस आला. त्यांच्याबरोबर ड्यूटीवर असणारे काही कर्मचारी देखील घरी गेल्याचा प्रकार समोर आला. वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नसल्याने एका रुग्णाला उपचाराविना दवाखान्यातून घरी परतावे लागले.रात्री अपरात्री रुग्णांना , परिसरातील अत्यवस्थ रुग्ण, अथवा गरोदर मातेला उपचाराविना जीवन-संघर्ष करावा लागतो. डॉक्‍टर मुख्यालयी राहत नसल्याने अनेक अडचणी नागरिकांना येतात. कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना तत्पर सेवा देता यावी, यासाठी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी लाखो रुपये खर्चून दवाखान्याच्या पुढील बाजूला निवासस्थाने बांधली आहेत. निवासस्थाने सुस्थितीत आहेत. मात्र, वैद्यकीय अधिकारी येथे राहत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या प्रसंगी गरोदर माता अथवा अत्यवस्थ रुग्ण येथे उपचारासाठी आली असता त्यांना उपचार मिळत नाहीत, अशी रुग्ण कल्याण समितीच्या सर्व सदस्य, व वसाकाचे माजी संचालक आण्णा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष रवींद्र शेवाळे, माजी सरपंच संजय मोरे, शिवसेनेचे प्रशांत शेवाळे , सोसायटीचे माजी चेअरमन, सुनील शेवाळे, विश्वास शेवाळे, बारकु शेवाळे, भाऊसाहेब बोरसे, गुलाब पवार, समाधान शेवाळे, पंडित पवार, व परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. *१(खामखेडा येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची दोन दिवसात बदली करण्यासाठी प्रयत्न करून या जागेवर नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल . सौ धनश्री ताई आहेर. जिल्हा परिषद सदस्या)* *२ (खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनसह कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून सेवा देणे बंधनकारक आहे. रात्री डॉक्‍टरांनी घरी जाण्याच्या केलेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू. – डॉ. सुभाष मांडगे , तालुका आरोग्य अधिकारी देवळा,)*. *ठोस प्रहार न्यूज चॅनल साठी तालुका प्रतिनिधी श्री महेश शिरोरे देवळा*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button