Dewala

देवळा एज्युकेशन सोसायटीच्या फलक चित्रांना उच्च कला अध्यापनाच्या पुस्तकात स्थान कलाशिक्षक भारत पवार यांच्या फलक चित्रांचा सन्मान

देवळा एज्युकेशन सोसायटीच्या फलक चित्रांना उच्च कला अध्यापनाच्या पुस्तकात स्थान कलाशिक्षक भारत पवार यांच्या फलक चित्रांचा सन्मान

देवळा : देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित जिजामाता कन्या विद्यालय ,देवळा
येथील कलाशिक्षक भारत पवार यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूद्वारे रेखाटलेल्या फलक चित्रांना कला विषयातील प्रसिद्ध लेखक,चित्रकार व अभिनव कला महाविद्यालय,पुणे येथील माजी प्राचार्य जयप्रकाश जगताप यांच्या कला अध्यापनात पुस्तकात स्थान मिळाले आहे.भारत पवार यांच्या या फलक चित्रांचा सन्मान यानिमित्ताने झाला आहे.
प्रसिद्ध लेखक व कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश जगताप यांच्या कला अध्यापन इंग्रजी आणि मराठी माध्यमातील ए.टी.डी.,ए.एम., जी.डी.आर्ट या कलेतील उच्च शिक्षण कोर्सच्या पुस्तकात प्रसिद्ध फलकलेखक भारत पवार यांनी रेखाटलेली फलक चित्रे छापण्यात आली आहेत.जे.जे.आर्ट बुक सिरीजचे हे २८ वे पुस्तक आहे.”आर्ट एक्सप्रेशन” या नावाने पुण्यामध्ये प्रकाशित झाले आहे.भारत पवार सर हे प्रत्येक दिनविशेषला अनुसरून विद्यार्थ्यांना सचित्र माहीत व्हावेत म्हणून विविध दिनविशेष फलक रेखाटन करीत असतात.पालक -विद्यार्थी यांच्यामध्ये या खडूद्वारे चितारलेल्या फलकचित्राची नेहमीच चर्चा होत असते.प्रसार माध्यमातून व्हाट्सएप,फेसबुक, इन्स्टाग्राम,वर्तमानपत्रात नेहमीच त्यांची चित्रे बघायला मिळतात.आतापर्यंत त्यांना विविध राज्यस्तरीय, जिल्ह्यास्तरीय पुरस्काराने मोठमोठ्या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.या फलक चित्रांची लेखक जयप्रकाश जगताप यांनी दखल घेऊन ती त्यांच्या पुस्तकात छापली याचा त्यांना विशेष आनंद आहे.त्यांच्या या फलक चित्रांना मिळालेल्या सन्मानार्थ त्यांचे देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर,व्हा.चेअरमन आक्कासाहेब आहेर, सचिव गंगाधरमामा शिरसाठ,उपपप्राचार्या डॉ. सौ.मालतीताई आहेर,गटशिक्षणाधिकारी,देवळा श्री.सतीश बच्छाव साहेब,केंद्रप्रमुख रावबा मोरे,मुख्याध्यापिका सौ.रंजना मोरे,मुख्याध्यापक श्री.दिलीप आहेर,पर्यवेक्षक श्री.ठोके सर ,आहेर सर,सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षिका,शिक्षेकेतर कर्मचारी, परिसरातील नागरिक विद्यार्थी ,पालकवर्ग यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button