Dewala

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हाउपाध्यक्षपदी रविंद्र शेवाळे यांची निवड।

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हाउपाध्यक्षपदी रविंद्र शेवाळे यांची निवड।

महेश शिरोरे

देवळा तालुक्यातील खामखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवळा तालुकाध्यक्ष रविंद्र महादू शेवाळे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा खा राजू शेट्टी यांच्या परवानगीने ही निवड करण्यात आली असून शेवाळे यांना जिल्हाउपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी राज्य कार्यकारी सदस्य गोविंद नाना पगार, जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ , जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुभाष अहिरे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते तर शेवाळे यांना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यात, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी रविंद्र शेवाळे यांची निवड करण्यात येऊन जिल्हा उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.यांच्या निवडीचे देवळा तालुक्यात फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले असून वसाकाचे माजी संचालक आण्णा पाटील, प्रतिष्ठित व्यापारी प्रकाश शिरोरे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रशांत शेवाळे , माजी सोसायटी चेअरमन समाधान शेवाळे , सोसायटीचे चेअरमन अभिमन शेवाळे, निवृत्ती बिरारी, आदींसह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button