चिमूर,चंद्रपूर

नवेगाव पेठ येथे पुण्यतिथी महोत्सव आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची उपस्थिती

नवेगाव पेठ येथे पुण्यतिथी महोत्सव
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची उपस्थिती

चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके
नवेगाव पेठ येथे गुरुदेव सेवा मंडळ ला सभागृह नसल्याने ती मागणी पूर्ण करून देण्याचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सांगत विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून नवेगाव पेठ येथून मताची आघाडी दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत
पुण्यतिथी ही दोन दिवसांची साजरी करीत असले तरी जीवन भर गुरुदेव विचारसरणी आचरण करण्याची गरज असल्याचे सांगितले .राज्यात लवकरच सत्ता बसणार असून 22 हजार हेक्टर शेतजमीन नुकसान झाली असून नुकसान भरपाई मिळणार असल्याचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सांगितले
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 51 व्या पुण्यतिथी निमित्य च्या श्री गुरुदेव सेवा मंडळ नवेगाव पेठ येथील कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते यावेळी प्रकाश महाराज वाघ सुरेश रामगुंडे निलम राचलवार मनिष तुंम्पलीवार प्रकाश बोकारे प्रा अशोक चरडे माजी सभापती विनोद चोखरे विजय बारापात्रे दिगंबरराव खलोरे सरपंच शकुंतला सतिकोसरे आदी उपस्थित होते .दरम्यान मनिष तुपल्लीवार यांचे हस्ते बक्षीस वितरण झाले.
प्रास्ताविक राजू देवतळे तर संचालन विवेक कापसे यांनी केले .आभार किशोर सिंगरे यांनी व्यक्त केले गुरुदेव भक्त वर्ग उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button