Pandharpur

पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रशांत खलिपे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रशांत खलिपे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नवीन कार्यकारी मंडळाची घोषणा पंढरपूर येथील केमिस्ट भवन येथे दिनांक १० ऑक्टोबर रोजी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.असोशियनचे विद्यमान तालुकाध्यक्ष प्रशांत खलिपे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत राबविण्यात आलेले विविध विधायक उपक्रम आणि कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रशासन आणि औषध विक्रेते यांच्यात समन्वय साधत प्रशांत खलिपे यांनी बजावलेली प्रभावी भूमिका लक्षात घेत त्यांची असोशियनच्या निवडणूक प्रक्रियेनुसार अध्यक्षपदासाठी फेरनिवड करण्यात आली.या वेळी पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे नवीन कार्यकारी मंडळ निवडणूक निर्णय अधिकारी गोवर्धन भट्टड यांनी पुढील प्रमाणे घोषित केले.
अध्यक्ष- श्री प्रशांत खलीपे
उपाध्यक्ष-श्री मिलिंद उकरंडे
सचिव -श्री महादेव जाधव
खजिनदार-श्री श्रीरंग राहेरकर सहसचिव.-सौ दिपाली ताई कारंडे जनसंपर्क अधिकारी- श्री उमेश गायकवाड तर संचालक पदी, सौ श्रद्धाताई कुलकर्णी, श्री रावसाहेब गवळी, श्री शिवराज पाटील, श्री मनोज वास्ते, श्री सचिन मेनकुदळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक सतीशअण्णा सादिगले,जेष्ठ केमिस्ट श्रीरंग बागल,मार्गदर्शक गोवर्धन भट्टड यांच्यासह सर्व जेष्ठी केमिस्ट बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button