Pandharpur

जिल्हा रुग्णालयात पोस्टर स्पर्धा

जिल्हा रुग्णालयात पोस्टर स्पर्धाफहिम शेख नंदुरबारनंदुरबार : जिल्हा रुग्णालय आहार विभाग व परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पोस्टर व पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. भोये होते. प्रमुख अतिथी म्हणून नीलिमा वळवी, आहार विभागप्रमुख तृप्ती नाईक, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्या एस्तेर मगर, पाठ्यनिर्देशक जितेंद्र चव्हाण, काजल कांबळे, नम्रता मदने यांच्यासह सर्व जीएनएमवएमएनएम विद्यार्थीनी उपस्थित होत्या. सप्ताहांतर्गत जिल्हा रुग्णालयात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button