Chandwad

शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहास २०० पुस्तके भेट

शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहास २०० पुस्तके भेट

उदय वायकोळे चांदवड

चांदवड येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील ग्रंथालयात आज बुधवार , दिनांक – ०९ आॕगस्ट २०२३ विविध विषयांची पुस्तके विद्यार्थ्यांना अभ्यासाठी असायला हवी या उद्देशाने प्रा उदय वायकोळे व भाजपा आदिवासी मोर्चा चे तालुकाध्यक्ष संजय पाडवी यांच्या प्रयत्नाने मुंबई येथील ‘ सिंघानिया ॲण्ड कंपनी ‘ चे ॲड प्रदिप कुमार जैन , नरिमन पॉईंट , मुंबई. येथुन विद्यार्थ्यांसाठी २०० अनमोल ग्रंथ भेट म्हणुन पाठवीले.
आज ०९ अॉगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्याने वसतिगृहाचे गृहपाल श्री अमोल निकम व लिपीक श्री जे. आर. उबाळे , व विद्यार्थ्यांच्या साक्षीने न्हनावे गावचे सरपंच कैलास गुंजाळ , प्रा. उदय वायकोळे , भाजपा आदिवासी मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय पाडवी यांनी पुस्तके वसतिगृहाच्या ग्रंथालयास सुपूर्द केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button