Gevrai

सकारात्मक उद्देशाने बदल घडून आणणारे बजरंग गु्पचे अनोखे कार्य – अनिल चव्हाण

सकारात्मक उद्देशाने बदल घडून आणणारे
बजरंग गु्पचे अनोखे कार्य – अनिल चव्हाण

गेवराई : उदभवणाऱ्या परिस्थितिनूसार योग्यतेने जीवनमान उंचावले पाहीजे. निर्माण होणाऱ्या अडचणीवर मात कशी करता येईल याची आखणी करणे गरजेचे आहे, आणि हीच कल्पना समोर ठेवून सकारात्मक उद्देशाने बदल घडून आणणारे गेवराई शहरातील बजरंग ग्रुपचे कार्य खरोखरच उत्तमतेने अनोखे असल्याचे प्रतिपादन शिर्डी येथील पोलीस सेवेत कार्यरत असलेले अनिल चव्हाण यांनी केले.
गेवराई शहरातील नविन मोंढा टिएमसी याठीकाणी, बजरंग गु्प बचत गटाच्या वतिने कर्ज वितरण समारंभ प्रसंगी अनिल चव्हाण हे बोलत होते. या आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. गणेशराव मोटे हे होते. सर्वप्रथम संंजय गायकवाड यांनी उपस्थित अतिथींचे स्वागत केले. पुढे बोलताना अनिल चव्हाण म्हणाले की, बजरंग गु्पचे खुप मोठे नाव असून समाजप्रेरीत कार्य असल्याने त्यांस बळ मिळो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी आदर्श व्यक्तीमत्व जगन्नाथ जाधव, शिवाजीराव खिंडकर, वैजनाथराव चौधरी, डाॅ. गणेशराव मोटे आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक बचत गटाचे सचिव सखारामजी कानगुडे यांनी केले. यावेळी बजरंग गु्प बचत गटाचे अध्यक्ष सुभाष मुळे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कोरोनाच्या अनुषंगाने व गरजूवंतांची कर्ज मागणी लक्षात घेऊन व केलेल्या नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमास गोपालसेठ जाकीटे, राजाराम कानडे सर, नारायण पवार, शिवाजीराव शिंदे, भास्करराव सुरवसे, संतोष सुतार, मधुकर बारगजे, अशोक थोरात, कैलास पट्टे, राजेंद्रजी सोनी, प्रा. किरणराव मदूरे, लक्ष्मण पवार, महेश कानगुडे यांंसह अनेक सदस्य उपस्थित होते.

****

Leave a Reply

Back to top button