Mumbai

पॉर्नपट सिरीज..बापरे 100 पेक्षा अधिक अश्लील व्हिडीओ…राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मागणी करणार…

पॉर्नपट सिरीज..बापरे 100 पेक्षा अधिक अश्लील व्हिडीओ…राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मागणी करणार…

मुंबई अश्लील चित्रपट निर्मिती करणारा राज कुंद्रा मुंबई पोलिसांच्या कस्टडीत आहे.प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी चा पती असलेल्या राज च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आज राज ला दिलेली 23 जुलै पर्यंत ची पोलीस कस्टडी संपली असून उद्या मुंबई पोलीस पुन्हा पोलीस कस्टडी मागणार आहेत.तपास कार्य वेगात सुरू असून न्यायालयाकडे तपासात गती यावी व तपास अधिक करता यावा यासाठी पोलीस कस्टडी मागण्याची दाट शक्यता आहे. उद्या यावर न्यायालय काय निर्णय देते ते समजेलच..

दरम्यान चौकशी उद्योगपती राजनेदीड वर्षात 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनवल्याची माहिती समोर आली आहे.अंधेरी (प) येथी कुंद्राच्या मालकीच्या वियान कंपनीच्या कार्यालयात गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी गुन्हे शाखेने टीबी (टेराबाइट्स) मध्ये चालणाऱ्या अश्लील चित्रपटांचा मोठा डेटा जप्त केला आहे. क्राइम ब्रँचच्या म्हणण्यानुसार बराच डेटा डिलीट केला आहे.हा डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यास वेळ लागणार आहे. त्यासाठी गुन्हे शाखेकडून फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

राज कुंद्रा यांनी ऑगस्ट 2019 मध्ये अश्लील चित्रपट बनवायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनविले आहेत. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, या चित्रपटांच्या माध्यमातून कुंद्रा यांनी मोठी कमाई केली आहे. ती कमाई कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. कुंद्रा यांच्या अ‍ॅपसाठी सुमारे 20 लाख लोकांनी सदस्यता घेतली होती.

पोलिसांना सहकार्य नाही

राज कुंद्रा पोलिस तपासात सहकार्य करत नाही. बर्‍याच प्रश्नांची उत्तरे देत नाही आणि बर्‍याच आरोपांचा इन्कार करत आहेत. कुंद्रा यांनी पोलिसांना सांगितले की, त्याने कधीही अश्लील चित्रपट बनवले नाहीत. मात्र, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मते कुंद्रा यांच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत.दरम्यान पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न देखील राज ने केला होता अशी देखील माहिती मिळत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button