धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन लागु होणार आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांना यश..
प्रतिनिधी : असद खाटीक
धुळे : धुळे महानगरपालिकेतील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी ७ वे वेतन लागु होण्या संदर्भात आमदार फारूक शाह यांना मागील कित्येक दिवसांपासून लागु न झालेले ७ वे वेतन आयोग लागु करण्या संदर्भात निवेदन दिले. या संदर्भात ७ वा वेतन लागु व्हावा यासाठी आमदार फारूक शाह यांनी वेळोवेळी महानगरपालिका प्रशासन व राज्य शासनाकडे मागणी केली होती. या संदर्भात आमदार फारूक शाह यांनी प्रधान सचिव यांची भेट घेऊन धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची मागणी प्रधान सचिवांच्या लक्षात आणुन दिली होती तसेच आज त्यांनी नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेत विषय लक्षात आणून दिला. यात महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग याआधीच लागु करण्यात आलेला असुन अद्यापही धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना लागु झालेला नाही. त्यामुळे सदर ७ वा वेतन आयोग लागु करून त्याचा फरक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर अदा करण्यात यावा असे यात नमुद केले आहे. तसेच धुळे महानगरपालिकेत १२ ते १४ वर्ष सेवेचा कार्यकाळ पुर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल करण्यात आलेली आहे. तरी सदर योजनेचा लाभ धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना देण्यात यावा.
याबाबत धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना पुढील आठवड्यात ७ वा वेतन आयोग लागु करण्या संदर्भात ठोस सकारात्मक निर्णय घेणार आहोत अशी ग्वाही राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार फारूक शाह यांना दिली.
,






