Chopda

ग.स,नोकरभरती बनावट दस्तऐवज प्रकरणी मा.न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करणार- रावसाहेब मांगो पाटील पत्रकार परिषदेत माहिती

ग.स,नोकरभरती बनावट दस्तऐवज प्रकरणी मा.न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करणार- रावसाहेब मांगो पाटील पत्रकार परिषदेत माहिती

ग.स,नोकरभरती बनावट दस्तऐवज प्रकरणी मा.न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करणार- रावसाहेब मांगो पाटील पत्रकार परिषदेत माहिती

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
  दि.६/५/२०१६ रोजी ग.स.संस्थेने नोकरभरती करीता कर्मचारी आकृतीबंध सादर करतांना एकूण ५४ पदे सरळसेवेने भरतीसाठी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था  नाशिक  यांचेकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.संस्थेने दाखल केलेल्या प्रस्तावानुसार व्यवस्थापकीय खर्च भागभांडवलाच्या प्रमाणाशी दोन टक्केपेक्षा अधिक असू नये अशी अट असल्यामुळे  तत्कालीन  चेअरमन व व्यवस्थापक  यांनी दाखल केलेल्या त्याच  कालावधीचा व्यवस्थापकीय  खर्चामध्ये कोट्यावधी रूपयांचा फरक आहे.तसेच संस्थेचे माजी चेअरमन विलास नेरकर व्यवस्थापक व संचालक  मंडळ यांनी कटकारस्थान करून  उच्च न्यायालयात  देखील  व्यवस्थापन  खर्चाबाबत विसंगती दाखविणारा खुलासा सादर केलेला आहे.तसेच नोकर भरतीत ६३ जागा नातेवाईकाच्या भरलेल्या आहेत.त्यामुळे नोकर भरतीसाठी संस्थेच्या  सर्व  सभासदांची  तसेच मा.न्यायालयाची देखील दिशाभुल संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापक तसेच संचालकांच्या  बेपरवाईमुळे झालेली असून याबाबत तक्रारदार  रावसाहेब  मांगो पाटील यांनी पोलिस अधीक्षक ,जळगाव  यांच्याकडे दि.२५/१०/२०१८ रोजी रितसर तक्रार दिलेली असून  येत्या आठ दिवसात बनावट दस्तऐवज  सादर करणाऱ्या  सर्व संचालकांविरोधात  क्रिमिनल रिट पिटीशन दाखल करणेत येणार असल्याची माहिती रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
   ग.स.ची बदनामी नाही तर भ्रष्ट कारभाराला सनदशीर मार्गाने वाचा फोडली-योगेश सनेर
     गेल्या चार वर्षापासून  ग,स.संचालकांनी केलेले गैरकारभार तक्रारी देवून मा.न्यायालयात आम्ही स्वतः चा वेळ व पैसा खर्च करून आम्ही सर्वसामान्य  सभासदांनसाठी सनदशीर मार्गाने लढा उभारला.मा.न्यायालयात दाखल केलेल्या  बहुतेक याचिका या डिसाईड असून सदर याचिका आम्ही केलेला पाठपुरावा हा कायदेशीर मुद्द्यांच्या आधारावरच असल्याने मा.न्यायालयाने आम्ही न्याय मागीतल्यामुळे  संस्थेचे नुकसान किंवा हाणी झाली अशा प्रकारचा कोणताही निष्कर्ष  अथवा मत नोँदवलेले नसून उलटपक्षी रावसाहेब  मांगो पाटील यांची याचिका क्र.१२/२०१९ उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद  यांनी दि.१० जून ,२०१९ रोजी दिलेल्या निकालपञात ग,स,च्या बेनामी अपसंपदेप्रकरणी दोषींवर मनी लाँन्ड्रींग सारख्या  गून्हाशी संबधीत सर्वावर गून्हे दाखल करण्याचे आदेश असून त्यामुळे दोन जणांवर गुन्हे दाखल असून इतर सर्व संचालकांनी अपसंपदेप्रकरणी अँन्टी करप्शन ब्युरो जळगाव  मार्फत चौकशी सुरू आहे,ग.स संचालकांनी कमावलेल्या अपसंपदेची भिती वाटत असल्यामुळेच तसे ग.स.चे गैरकारभार सनदशीर मार्गाने आम्ही वर्तमानपञ, सोशल मिडीया,सहकार आयुक्त ,न्यायालयातही सर्व पुरावेनीशी सादर केलेले असून ही ग.स,ची बदनामी  नसून संस्थेत गैरकारभार होवू नये म्हणून जनजागृती आहे,माञ संचालक  मंडळाला भविष्यकाळात  देखील कदाचित भ्रष्टाचार करायचा असेल म्हणून ग.स चे आम्हा दोन जागल्या सभासदांना  काढण्यासाठी संचालक  मंडळाने षडयंञ रचत विषय क्र.१२ जनरल मिटींगच्या अजेंडावर घेतला . विषय क्र बारा संस्थेचे सभासद योगेश जगन्नाथ सनेर व  रावसाहेब  मांगो पाटील यांना सहकार कायद्यान्वये १९६० चे कलम ३५ अन्वये सभासदत्व रद्द करणेसाठी जनरल सभेसमोर अशा सभासदांना आपले मत मांडण्याचा अधिकार असतांना अध्यक्ष  व संचालक  मंडळाने तसे होवू दिले नाही कारण आमच्याजवळ वस्तुस्थितीजन्य  पुरावे आहेत.हीच भिती संचालक  मंडळाला असल्यामुळे आपल्या  भ्रष्ट कारभाराचे वाभाडे सर्वसामान्य  सभासदांसमोर येवू नयेत यामुळेच आम्हांला  बोलण्याची संधी सहकार कायद्यान्वये मिळालेली नाही.ग.स,त स्वतः चीच  पत्नी ,मुले यांची नोकरभरती बेकायदेशीर  केल्याने विपीन पाटील व संदिप केदारे यांनी पिटीशन दाखल केलेले असून येत्या दोन तीन दिवसांत  याबाबत सुनावणी आहे, एकंदरीत अमळनेर इमारत विक्री,नोकरभरतीत दिलेले वेगवेगळे व्यवस्थापन खर्च दस्तऐवज,तसेच तत्कालीन जिल्हा उपनिबंधक यांचे लेखापरिक्षण कोणत्या संचालकाने संस्थेचे किती आर्थिक  नुकसान केले? त्याची रक्कम  व्याजासह वसुल करण्याचे दि.१५ सप्टेंबर,२०१७ रोजी आदेश केलेले आहेत सर्व ग,स.संचालक  यांची अपसंपदेप्रकरणी सुरू असलेली चौकशी व दाखल झालेले गुन्हे या भितीमुळेच सभासद हिताचे स्वतः चे पैसे वेळ खर्च करून प्रामाणिकपणे आम्ही काम करीत असतांना भविष्यकाळात  यांच्या  चुकीच्या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात  दाद मागू नये ही द्वेशाची भावना ठेवून बेकायदेशीरपणे आमचे सभासदत्व सभासदांची इच्छा नसतांनाही रद्द करणेचा प्रयत्न केला जात असून यामुळे सभासदच यांना धडा शिकवतील .
          पत्रकार परिषदेत शिक्षक सेनेचे सरचिटणीस श्रीकृष्ण चौधरी, मुरलीधर साळुंखे,शिक्षक  संघाचे राजेश  पाटील ,विपीन पाटील, धनराज बडगे ,संजय गुरव,मिलींद पाटील, अरविंद चौधरी ,विजय कचवे,प्रशांत सोनवणे,प्रमोद देवरे ,पंकज बडगुजर,ऋषीकेष पाटील,मुकूंद केदारे,सोमनाथ देवराज,गोपाल बाविस्कर,उज्वल पाटील, सतिष सनेर उपस्थित होते. प्रास्तविक धनराज बडगे तर आभार प्रदर्शन हे जेष्ठ सभासद संजय गुरव यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button