Pandharpur

मोटरसायकली चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंद, 46 दुचाकी जप्त, जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई पंढरपूर शहर पोलीसांची कामगिरी

मोटरसायकली चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंद, 46 दुचाकी जप्त, जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई पंढरपूर शहर पोलीसांची कामगिरी

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर,मध्ये गेले काही दिवसांपासून दिवसाढवळ्या दुचाकी लंपास केल्या जात होत्या. त्यामुळे
वाहनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पंढरपूर शहर पोलिसांनी दरोडेखोरांसह मोटर सायकल चोरी करणारी एक मोठी टोळी जेरबंद केली असून या टोळीकडून एकूण 46 मोटरसायकलसह तब्बल 14 लाख 15 हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे कौतुक केले जात आहे.या बाबतची अधिक माहिती अशी की,शहरातील एका संशयीत आरोपीला पोलिसांनी 7 दुचाकींची चोरी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले असता त्याच्यासह इतर 4 आरोपींनी पंढरपूर, नातेपुते, माळशिरससह इतर जिल्ह्यांतून 14 लाख 15 हजार रुपये किंमतीच्या 46 मोटार सायकली चोरी करुन विक्री केल्याचे कबूल केले आहे. पोलीसांनी या प्रकरणातील 5 पैकी 4 आरोपींना अटक केली असून मुख्य एक आरोपी अद्यापही फरार आहे. दुचाकी चोरी करणार्‍या मोठ्या रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे.याबाबत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,शहर पोनि अरुण पवार, तालुका पोनि किरण अवचर,ग्रामीण चे पोनि प्रशांत भस्मे,गुन्हे शाखेचे सपोनि राजेंद्र मगदूम आदी अधिकारी उपस्थित होते.दि.21 मे रोजी दुचाकी चोरीबाबत शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस त्यांच्या रॅकॉर्डवरील आरोपी पंढरपूर शहरातील संभाजी चौक येथील अतूल नागनाथ जाधव याच्या हालचालीवर पोलीसांची नजर होती. त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने पंढरपूर शहरातून व इतर ठिकाणाहून 9 मोटार सायकली चोरल्या असल्याचे निष्पन्न झाले. या चोरलेल्या मोटार सायकलीपैकी एक मोटार सायकल नातेपुते येथील त्याच्या मित्रास विकली असल्याचे सांगीतले. त्या मित्रास ताब्यात घेवून चौकशी केली असता अतूल जाधव याने 7 मोटार सायकली त्याच्याकडे विक्री करण्यास दिल्यांचे निष्पन्न झाले. या दोघांना पोलीसांनी अटक करुन त्यांच्याकडून 16 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.या गुन्ह्यातील नातेपुते येथील शकील शेख या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता मोरोची ता. माळशिरस येथील अभिमान खिलारे यांच्याकडे मोटार सायकली विक्री करीता आरोपी शेख हा देत होता.अभिमान खिलारे या आरोपीकडे चोरीतील 15 मोटार सायकली आढळून आल्या. त्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत. आरोपी खिलारे याच्याकडे पोलीसांनी अधिक चौकशी केली असता तो घाणंद, ता. आटपाडी येथील प्रणव ढगे याच्याकडे विक्रीसाठी देत होता. प्रणव ढगे यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने 15 मोटार सायकली विक्री केल्या असल्याचे सांगीतले. विक्री केलेल्या 15 मोटार सायकली पोलीसांनी जप्त केल्या आहेत. तर यातील मुख्य आरोपी नामदेव बबन चुनाडे (रा.पंढरपूर) हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या आरोपींनी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील मोटार सायकली चोरल्या आहेत.
या आरोपींवर पंढरपूर शहर, नातेपूते पोलीस ठाणे, माळशिरस पोलीस ठाणे, इंदापूर पोलीस ठाणे येथे मोटार सायकल चोरी, जबरी चोरी, बलात्कार , धमकी देणे आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पंढरपूर शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी तांत्रिक दृष्या तपास करुन चार आरोपींना अटक करुन 14 लाख 15 हजार रुपये किंमतींच्या विविध कंपनींच्या 46 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आवाहन–

जेव्हा एक लाखाची गाडी दहा हजार रुपयाला मिळते तेव्हा गाडी कोणाची,कुठून आली आहे हे गाडी घेताना नागरिकांनी तपासावे व याबाबत त्वरीत पोलिसांना संपर्क करावा या घटनेतील मुख्य आरोपी च्या आम्ही शोधात आहोत तो सापडल्यास आणखीही अनेक घटना उघडकीस येतील. नागरिकांनी महागड्या गाड्या स्वतःत मिळत असतील तर त्या विकत घेऊ नये,असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button