Pune

वंदना साळुंखे यांना राज्यस्तरीय कस्तुरी गौरव पुरस्कार जाहीर

वंदना साळुंखे यांना राज्यस्तरीय कस्तुरी गौरव पुरस्कार जाहीर

पुणे/ एस एम पोरे-

खानदेश अहिराणी कस्तुरी साहित्य ,सांस्कृतिक ,कला ,क्रीडा मंच ,महाराष्ट्र राज्य यांचा सामाजिक क्षेत्रातील ” गौरव स्ञी शक्तीचा ” कस्तुरी राज्यस्तरीय पुरस्कार सौ.वंदना हरिदास सांळुखे यांना जाहीर झाल्याची माहिती मंचच्या अध्यक्ष सौ विजया सुरेश मानमोडे यांनी दिली.
८ मार्चला सकाळी ११वा. प्रतिभा महाविद्यालय , चिंचवड ,पुणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण होणार आहे .
व्यावसायिक असलेल्या सौ.साळुंखे या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या वाखरी गावातील असुन बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याचे काम करत आहेत .
२०११ साली स्थापन झालेल्या महात्मा महिला ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेच्या विद्यमान चेअरमन म्हणून काम पाहत आहेत, त्याचबरोबर
२०१५ ला स्थापन झालेल्या शुभलक्ष्मी महिला बचत गटाच्या ऊपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत .
पतसंस्था व बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक साक्षर व स्वतःच्या पायावर ऊभा राहण्यासाठी गेल्या काही वर्षापासुन कार्यरत आहेत. याबरोबरच होलसेल किराणा मालाचे दुकान सांभाळत पतीला व्यवसायात मोलाची साथ देत आहेत . येणाऱ्या काळात महिला व बालक , मुलींसाठी भरीव काम करण्याचा त्यांचा मानस आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button