Ahamdanagar

पाथर्डी मार्केट कमेटीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवशंकर राजळे यांचा सन्मान सोहळा संपन्न

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष शिवशंकर राजळे यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानि केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेरमन प्रतापराव ढाकणे हे होते.शिवशंकर राजळे यांनी सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार संघटन उभे करू असे सांगत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली. विषेशतः महसूल,आरोग्य आणि पोलिस प्रशासनात जे गैरप्रकार सुरु आहेत ते सविस्तर सांगितले. त्यांना लगाम लावण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम काम करणार असल्याचे राजळे यांनी सांगितले. प्रतापराव ढाकणे म्हणाले मागिल काळात अकराशे कोटींच्या विकासाच्या गप्पा लोकप्रतिनिधीनी मारल्या तो विकास नेमका कोठे झाला याचा काही ताळमेळ लागत नाही.मागील काळात झालेल्या चुका यावेळी निश्चितच दुरुस्त करू असे ढाकणे यांनी स्पष्ट केले. या सोहळ्यात सिताराम बोरुडे, बंडू बोरुडे, बाळासाहेब घुले,बाळासाहेब दराडे,हुमायून आतार,जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे,रामराव चव्हाण, यांनी आपले विचार व्यक्त केले. गहिनीनाथ शिरसाठ, स्वप्नील देशमुख, रत्नमाला उदमले,राष्ट्रीय काँग्रेसचे संघटक सचिन राजळे,युवा नेते संदीप राजळे,अरविंद भगत यांच्या सह पाथर्डी तालुक्यातील अनेक मांन्यवर उपस्थित होते.यावेळी कासार पिंपळगाव ग्रामस्थाच्या वतीनेही जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीत शिवशंकर राजळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button