पंढरपूर

पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई

पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई

पंढरपूर प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर शहरात यात्रा कालावधीत एकादशी, मंगळवार बाजार दिवशी अशा ठिकाणात तसेच पार्किंग जागा असलेल्या ठिकाणांतून विविध कंपन्यांचे किमती मोबाईची चोरी करण्यांचे प्रकार वारंवार घडत होते.
याबबत पंढरपूर शहर पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांनी सखोल चौकशी करुन अशा प्रकारचे गुन्हे करणार्यांच्या मागावर पोलस पथक नेमले.दरम्यान याबाबत शोधमोहीम व कसून तपास केले असता शहरातील तीन आरोपींना ताब्यात घेतले.यामध्ये एक अल्पवयीन असून दोन सज्ञान आहेत. त्यांच्याकडून ५५ मोबाईल मिळून आले. या मोबाईलची अंदाजे किमती ४ लाख ७ हजार ७०० एवढी असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपविभागीय अधिक्षक डाॅ.सागर कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button