India

Optical Illusion: आजी, सोफा, पुस्तके दिसले..? आता मासे शोधा पाहू…

Optical Illusion: आजी, सोफा, पुस्तके दिसले..? आता मासे शोधा पाहू…

तुम्ही या चित्रामध्ये एक आजीबाई पाहू शकता. या आजीबाई सोफ्यावर बसून मस्तपैकी मासे खात होत्या. पण पाळीव मांजरींनी त्यांच्या ताटातले मासे पळवले. हे मासे आजीच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी लपवून ठेवले आहेत. ही आजी बराच वेळ ते मासे शोधतेय पण तिला काही ते सापडलेले नाहीत. जर तुम्ही हुशार असाल तर ते मासे शोधून दाखवा. वरकरणी हे कोडं फारच सोपं वाटतंय, पण खरं तर भल्याभल्यांना हे कोडं सुटलेले नाही. चला तर मग पाहूया तुम्ही हे मासे शोधू शकता का?
या चित्रामध्ये पुस्तकं, टेबल, खुर्च्या, लँप, फोटोफेम्स, मांजरी अशा असंख्य गोष्टी आहेत. अन् या वस्तूंमध्येच कुठेतरी मासे लपवलेले आहेत. हे मासे शोधण्यासाठी आपल्याला चित्राचं नीट निरिक्षण करावं लागेल. प्रत्येक कोपरा तपासून पाहावा लागेल. चला तर मग शोधायला सुरूवात करायची का?
10 सेकंदानंतरही तुम्हाला ते मासे सापडले नाहीत का? तर जरा २ सेकंद पाहा, अन् खाली दिलेलं चित्र पाहा, त्यामध्ये या कोड्याचं उत्तर दिलेलं आहे.

Optical Illusion: आजी, सोफा, पुस्तके दिसले..? आता मासे शोधा पाहू...

पहिला मासा पुस्तकांमध्ये लपवलाय तर दुसरा मासा त्या लँपमध्ये पाहा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button