Dhule

आपले शहर सुंदर शहर या संकल्पनेतून शहरात मुख्य १० चौक होणार सुशोभित शहरातील प्रवेश मार्गांवर ५ ठिकाणी होणार आकर्षक मांडणीचे सुशोभीकरण – आमदार फारूक शाह यांची माहिती…

आपले शहर सुंदर शहर या संकल्पनेतून शहरात मुख्य १० चौक होणार सुशोभित शहरातील प्रवेश मार्गांवर ५ ठिकाणी होणार आकर्षक मांडणीचे सुशोभीकरण – आमदार फारूक शाह यांची माहिती…

असद खाटीक धुळे

Dhule : दि. ०४-१२-२०२० आपले शहर सुंदर शहर या संकल्पनेतून शहरातील १० मुख्य चौक तसेच शहरात प्रवेश असलेल्या मुख्य प्रवेशाच्या ठीकाणी आकर्षक मांडणीचे सुशोभीकरण होणार असल्याने आज धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासह शहरात असलेले विविध १० चौकांची पाहणी केली. त्यात प्रामुख्याने दत्तमंदिर चौक, नूर चौक, एकविरा माता नेहरू चौक, क्रांती चौक, १२ फत्तर चौक, वडजाई रोड १०० फुटी रोड कॉर्नर, तिरंगा चौक, गणपती मंदिर चौक, अल्लामा ईकबाल चौक या सारखे १० ठिकाणीच्या चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि शहरातील मुख्य चौकांना नवीन रूप येणार असून शहराच्या विकास कामांसोबतच शहरातील प्रवेश मार्गांवर जसे जळगाव चौफुली, नगांव चौफुली, महिंदळे चौफुली, सुरत बायपास, चाळीसगाव चौफुली अश्या शहरातील प्रमुख प्रवेश मार्गांवर ५ ठिकाणी होणार आकर्षक मांडणीचे सुशोभीकरण होणार असून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे अशी माहिती आमदार फारूक शाह यांनी प्रसार माध्यमांना बोलतांना दिली. या पाहणी दौऱ्या प्रसंगी आमदार फारूक शाह यांच्या सोबत धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एजाज शाह, नगरसेवक नासिर पठाण, सईद बेग, निलेश काटे, परवेज शाह, सेहबाज शाह, चिराग शेख, रफिक शाह, पोपट शाह, कैसर पेंटर, सेहजाद भाई आदींसह अधिकारी – कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button