Amalner

Amalner: राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने खुली वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.. वाचा अटी नियम..व पहा ऑनलाइन लिंक..

राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने खुली वक्तृत्व स्पर्धा

युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियाना अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने खुली वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वकृत्व स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आली असून अ गटामध्ये वय वर्ष सहा ते सोळा आणि ब गटामध्ये वय वर्ष 16 व त्यापुढे याप्रमाणे गट असून दोन्ही गटांसाठी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज हा विषय ठेवण्यात आला आहे. सदरच्या विषयावर प्रत्येक स्पर्धकाला तीन मिनिटांचा एक व्हिडिओ सादर करायचा आहे.
स्पर्धेसाठी अ आणि ब गटांकरिता खालील प्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत.

■ प्रथम बक्षीस रोख रक्कम
₹ २५००/- मात्र + ट्राफी
■ द्वितीय बक्षीस रोख रक्कम
₹ १५००/- मात्र + ट्राफी
■ तृतीय बक्षीस रोख रक्कम
₹ १०००/- मात्र + ट्राफी

५ उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रोख रक्कम ₹२००/- मात्र आणि ट्राफी*

● सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल.

*स्पर्धेचे नियम*

१)वरील दोन्ही गटांसाठी *स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज* हा विषय असेल. सदरच्या विषयावर सुमारे तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करून खालील दिलेल्या टेलिग्राम लिंक वर पाठवायचा आहे सोबतच स्पर्धकांनी आपले नाव नाव पत्ता मोबाईल क्रमांक आधार कार्ड अपलोड करून वरील लिंक वर पाठवायचा आहे.
२)तीन मिनिटांपेक्षा अधिक चा कालावधी असलेला व्हिडीओ ग्राह्य धरल्या जाणार नाही.
३) दिनांक 12 फेब्रुवारी 2022 पर्यंत सदर विषयावर व्हिडिओ वरील लिंक वर पोहोचणे अनिवार्य आहे.
४) व्हिडीओच्या प्रारंभात स्वतःचे नाव , वय याचा उल्लेख करून स्पर्धेतील विषयाला सुरुवात करावी.
५) स्पर्धेचा बक्षीस समारंभ *१९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिव जयंतीला* असेल सदर कार्यक्रमाची सविस्तर माहिती लवकरच कळविली जाईल.
६)परीक्षकांच्या निर्णय अंतिम राहील.
७)प्रवेश शुल्क प्रति स्पर्धकास ₹ २५/- मात्र असेल आणि हे शुल्क
G Pay किंवा Phone Pe ने
9595954871 या क्रमांकावर पाठवून स्क्रीन शॉट घेऊन वरील टेलिग्राम लिंक वर पाठविणे बंधनकारक आहे.
८)स्पर्धकांनी आपले विचार मराठी,हिंदी,इंग्रजी यापैकी एका भाषेत व्यक्त करायचे आहे.

९) शाळा/महाविद्यालयातून १० स्पर्धकांना सहभागासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांना *उपक्रमशील शिक्षक* म्हणून सन्मानित केले जाईल तथा २५ स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन स्पर्धेमध्ये सहभागी करून दिल्यास *उपक्रमशील मुख्याध्यापक/प्राचार्य* म्हणून सन्मानित केले जाईल.
अधिक माहितीसाठी प्रा अशोक पवार 9422278256 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

https://t.me/+inzol22fp11hOWM1

🎯 महत्वाची सूचना:

टेलिग्राम ची लिंक काही तांत्रिक अडचणीमुळे बदलण्यात आली आहे, वरील लिंक वर व्हिडिओ पाठवावेत हि विनंती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button