Pune

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पै. आकाराम कोळेकर यांची निवड

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पै. आकाराम कोळेकर यांची निवड

दत्ताजी परेकर

पुणे : पुणे येथे होऊ घातलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सांगली येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी पार पडली. यावेळी माती विभागामध्ये विविध वजन गटात आरेवाडीकरांनी प्रेक्षणीय लढती करत वाहवा मिळवली. पै. आकाराम कोंडीबा कोळेकर याने ९७ किलो वजन जिल्ह्यात अजिंक्य ठरत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आगेकूच केली.
यावेळी पै. शुभम सखाराम कोळेकर याने ९७ किलो वजन गटात अव्वल जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावत अव्वल खेळी केली. पै. नितीन चंदर कोळेकर (८६ ते १२० किलो गट) याने शेवटपर्यंत निकराची झुंज दिली. तसेच पै. सयाजी नाना कोळेकर याने नामचीन मल्लाला अस्मानी दाखवत चटकदार कुस्ती केली. आणि पै. काशिलिंग आप्पा कोळेकर (७४ किलो गट) व पै. समाधान दादा कोळेकर (६९ किलो गटात तिसरा क्रमांक) यांनीही चांगली लढत देऊन आरेवाडीच्या लाल मातीतली चमक दाखवून दिली.
पै. आकाराम कोळेकर यांनी मायभुमी आरेवाडीच्या नावलौकिकात भर टाकत महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी धडक मारली आहे. लवकरच पुणे येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आकारामची लढत होणार आहे. आरेवाडीच्या कुस्तीची परंपरा पिढीजात जपली जात असून नवीन तरुण मोठी भरारी घेत गावाचे नाव रोशन करत आहेत.
या जिल्हास्तरीय निवड चाचणीत अव्वल खेळी करणार्‍या सर्व कुस्तीपट्टूंचे कौतुक होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button