Amalner

Amalner: छत्रपती शिवाजी महाराज आदर्श संस्कारांचे मूर्तिमंत दिपस्तंभ… जेष्ट क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श संस्कारांचे मूर्तिमंत दिपस्तंभ…
जेष्ट क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून वकृत्वस्पर्धा…

अमळनेर प्रतिनिधी- जो समाज आपला इतिहास जाणत नाही, तो इतिहास घडवत नाही ही वस्तुस्थिती असल्याने महात्मा फुले यांनी तो इतिहास शोधून जगासमोर मांडला. छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे आपल्याला समजू शकले.
आता घरात, शाळेत संस्कार दिले जातात परंतु ते संस्कार पाहिजे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही. अगोदर शाळा नव्हती तरी संस्कार होते. आज विद्यार्थ्यांना संस्काराची गरज आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनात रुजवले पाहीजे व सुसंस्कृत आदर्श नागरिक बनले पाहिजे असे देवगांव देवळी येथे 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत अध्यक्षीय भाषणावरून ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक अनिल महाजन , स्काऊट शिक्षक एस के महाजन, वकृत्व स्पर्धेचे परीक्षक एच.ओ. माळी,लिपिक एन जी देशमुख होते.
शाळेचे मुख्याध्यापक अनिल माझं यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी माल्यार्पण केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने शाळेत वकृत्व स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीतील 20 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर केला.
वकृत्व स्पर्धेचे नियोजन शाळेचे सांस्कृतिक प्रतिनिधी आय.आर.महाजन यांनी केले. वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून एच.ओ. माळी यांनी काम पाहिले.
वकृत्व स्पर्धेत प्रथम वैशाली पाटील इयत्ता दहावी, द्वितीय हर्षला पाटील इयत्ता नववी, तृतीय गायत्री भिल इयत्ता आठवी, उत्तेजनार्थ यशस्वी पाटील इयत्ता दहावी,
जयश्री पाटील ,श्‍वेता बैसाने, वैष्णवी माळी इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गीत सादर केल्यामुळे त्यांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वकृत्व स्पर्धेचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.के. महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुदास पाटील संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button