India

Omicron: नवीन लक्षणे आली निदर्शनास..! “ही” लक्षणे दिसत असल्यास घ्या काळजी.!

Omicron: नवीन लक्षणे आली निदर्शनास..! “ही” लक्षणे दिसत असल्यास घ्या काळजी.!

Covid-19 : ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या (Corona) नवीन व्हेरियंटने जगभरात दहशत पसरवली आहे. कोरोनाचा हा व्हेरियंट आधीच्या व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक आहे. त्याच वेळी, ओमायक्रॉनमध्ये अनेक प्रकारची लक्षणे देखील दिसून येतात, ज्याचा परिणाम अनेक लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होत आहे. ओमायक्रॉनची अशी अनेक लक्षणे आहेत, जी तुम्हाला बराच काळ प्रभावित करू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही देखील तुमच्या शरीरात दिसणार्‍या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कारण, ती ओमायक्रॉनची लक्षण देखील असू शकतात. चला तर, जाणून घेऊया अशी कोणती लक्षणे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे.
जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर तुम्ही ते हलक्यात घेता कामा नये. कारण ते ओमायक्रॉनचे लक्षण देखील असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांकडे जावे आणि तपासणी करावी. तसेच कोरोना चाचणी करावी. रिपोर्ट येईपर्यंत घरातदेखील मास्क लावून वावरावे. यासोबतच लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या व्हेरियंटमध्ये सौम्य ताप हे एक सामान्य लक्षण होते. त्याच वेळी, काही लोकांनी ओमायक्रॉन दरम्यान देखील तापाची तक्रार केली आहे. त्यामुळे, तुम्हालाही अनेक दिवस तापाची तक्रार असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच कोरोना चाचणी करून घ्या.
डोळे दुखणे किंवा सूज येणे, जळजळ होणे आणि डोळ्यांतून पाणी येणे अशी कोणतीही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
कोरोना व्हायरस किंवा ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी, स्वच्छतेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासोबतच नेहमी मास्क लावावा आणि वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे. याशिवाय, जर तुम्ही लस घेतली नसेल, तर लगेच लस घ्या. लसीकरणाने तुम्ही स्वतःला संसर्ग होण्यापासून वाचवू शकता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button