पंढरपूर

लाच स्वीकारणाऱ्या पोलीस निरीक्षक विश्‍वास साळोखे यांना न्यायालयाने चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

लाच स्वीकारणाऱ्या पोलीस निरीक्षक विश्‍वास साळोखे यांना न्यायालयाने चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

पंढरपूर प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांना चार वर्षे सक्त मजूरी शिक्षा झाली आहे. तीन वर्षांपूर्वी ते मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना त्यांना लाच घेण्याच्या प्रकरणात अटक केली होती. सोलापूरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके यांच्याशी झालेला वादामुळे विश्वास साळोखे चर्चेत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button