Champa

अभी नही तो फिर कब सोशल ग्रुप नागपूरतर्फे गावागावात जाऊन जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप;

अभी नही तो फिर कब सोशल ग्रुप नागपूरतर्फे गावागावात जाऊन जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप;

*सरपंच अतिश पवार यांचा पुढाकार*!

अनिल पवार

चांपा: कोरोनामुळे हातावर काम करून आपले व कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीबांचा रोजगार बुडाला व सर्वाधिक फटका मजूर , कष्टकरी आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना बसiला आहे .शेतमजूर आणि खासगी ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे .

अशात सरपंच अतिश पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत उमरेड तालुक्यातील गावागावात जाऊन उपासमार सुरू असणाऱ्या गरजू कुटुंबाना मदतीचा हात दिला .

सरपंच अतिश पवार यांनी आपल्या गावातच नव्हे तर इतरत्र गावातील उपासमार सुरू असणाऱ्या गरजूना मदत करण्यासाठी रेड स्वस्तिक सोसायटीचे अध्यक्ष व माझी पोलिस महासंचालक टि .एस भाल यांच्याकडे मदत मागितली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली “अभी नही तो फिर कब “सोशल ग्रुप पुढे आला आहे .

या ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत उमरेड तालुक्यात चांपा परिसरातील चांपा , सुकळी, मांगली, खापरी कुरडकर , राजुलवाडी ,भगत हेटि आदी गावांतील १०५गोरगरीब गरजू नागरिकांना सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप केले . यावेळी अन्नधान्य प्राप्त गरजूनी सरपंच अतिश पवार यांचे आभार मानले .

यावेळी “अभी नही तो फिर कब “सोशल ग्रुपचे चार्टर्ड अकाउंटट सचिन मुकेवार , स्किन स्पेशलिस्ट डॉ .सुशील पांडे , त्वचा विशेषज्ञ डॉ .सुधीर ममीद्वार, महाराष्ट्र मेट्रोचे विवेक होकम , विमा सर्वेक्षणकर्ता रवी पहलजानी , टाटा कन्सल्टंटन्सीचे प्रसाद पेंढारकर , आर्किटेक्ट हितेश ठोकर , उद्योगपती अमेया खानोलकर , राहुल बनकर , चांप्याचे सरपंच अतिश पवार, उपसरपंच अर्चना सिरसाम , मंजूषा आदींच्या उपस्थीतीत १०५ गोरगरीब गरजूना अन्नधान्य किटचे वाटप केले .यावेळी अन्नधान्य प्राप्त गरजूनी सरपंच अतिश पवार यांचे आभार मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button