Amalner

मुद्रांक विक्रेत्यांना नोटीस..!जास्तीचे पैसे घेऊ नये व सर्व नागरिकांना स्टॅम्प उपलब्ध करून द्यावा अन्यथा कार्यवाही..!

मुद्रांक विक्रेत्यांना नोटीस..!जास्तीचे पैसे घेऊ नये व सर्व नागरिकांना स्टॅम्प उपलब्ध करून द्यावा अन्यथा कार्यवाही..!

अमळनेर येथे तहसिल कार्यालयाजवळ असणारे स्टॅम्प वेंडर 100 रु चे स्टॅम्प देत
नाहीत.त्यांच्याकडे असताना देखील 100 रुपये स्टॅम्प उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.तसेच अधिक 20/- जास्तीचे घेतले जात आहे. या संदर्भात ऑनलाइन तक्रार आपले सरकार पोर्टल वर दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रति जिल्हा दुय्यम निबंधक व तहसीलदार अमळनेर यांना देण्यात आल्या आहेत.

उपरोक्त तकारीच्या अनुषंगाने सर्व मुद्रांक विक्रेते इ दस्तलेखक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नागरीकानां कोर्ट फी तिकिटे व मुद्रांक शुल्क ज्या किमतीचे असतील (उदा.5 रु.10 स्टॅम्प इ मुद्रांक स्टॅम्प पेपर 100 ,500 रु इ किमतीचे संबधीत नागरीकांना तात्काळ देण्यात यावेत जेणे करून तक्रार होणार नाही.
या संदर्भात तसे काही आढळून आल्यास सक्त कार्यवाही करण्यात येईल.
अशी सूचना देण्यात आली आहे. सदर तक्रार किरण जाधव यांनी दाखल केली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button